विकतच्यापेक्षा हातच्या लोणच्याची चवच न्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:33 AM2021-05-23T04:33:19+5:302021-05-23T04:33:19+5:30

माजलगाव : अक्षय तृतियेपासून आंबे पूजा करून खाण्यास सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच पाडाच्या कैऱ्यापासून घरोघरी महिलांनी लोणचे बनवण्यास ...

The taste of hand pickles is better than selling | विकतच्यापेक्षा हातच्या लोणच्याची चवच न्यारी

विकतच्यापेक्षा हातच्या लोणच्याची चवच न्यारी

Next

माजलगाव : अक्षय तृतियेपासून आंबे पूजा करून खाण्यास सुरुवात झाली आहे. त्याबरोबरच पाडाच्या कैऱ्यापासून घरोघरी महिलांनी लोणचे बनवण्यास सुरूवात केली आहे. घरात तयार केलेल्या मसाल्याचा वापर करण्यात येत असल्याने विकतच्या लोणच्यापेक्षा हातच्या चटपटीत लोणच्याची चवच न्यारी असते.. असे म्हणावे लागेल.

मराठवाड्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच घरोघरी महिला गव्हापासून शेवया, कुरडई, बाजरीच्या खारवड्या-पापड्या, तांदळापासून पापड्या, उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स, चकल्या, शाबुदाणा चिप्स-चकल्या आदी वाळवून ठेवण्याचे पदार्थ तयार करण्यात व्यस्त असतात, तर हिंदू संस्कृतीप्रमाणे अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे पूजन करून ते खावयास सुरुवात होते. ज्याच्या घरात आंब्याला कैऱ्या आल्या आहेत अशा घरी व जे खवय्ये आहेत ते बाहेरून आंबे विकत आणून घरात लोणचे तयार करून घेतात. बाहेरील विकतच्या लोणच्यात कसेही खाद्यतेल वापरलेले असते. त्याबरोबरच तिखट व मसाला देखील बरोबर नसतो. त्यामुळे बऱ्याचदा असे लोणचे खाल्ल्यावर जळजळीचा त्रास होतो म्हणून घराघरात घरी कैऱ्या आणून लोणचे घालण्यात येते. त्यासाठी घरातील सदस्य महिलांना मदत करतात.

-----

लोणचे बनवण्यासाठी साहित्य

कैरी कापण्याची कत्ती, १०० कैऱ्यासाठी कारळ अर्धा किलो, घरी तयार केलेली पाव किलो हळद, मोहरी पाव किलो, मीठ पाव किलो, एक किलो शेंगदाणा किंवा करडई तेल, मोहरी डाळ १०० ग्रॅम, हिंग, मेथ्या, लवंग, घरी तयार केलेले लाल तिखट पाव किलो आदी साहित्याचा वापर करून ५० कैऱ्यांचे कारळ लोणचे व ५० कैऱ्यांचे तिखट लोणचे तयार होते.

...

---

लोणच्यासाठी खर्च पुढीलप्रमाणे...

कैऱ्या -४०० रुपये (शेकडा). शेंगदाणा तेल २००, मोहरी ४०, मोहरी डाळ ४०, हिंग ३०, लाल तिखट ५०, मेथ्या २०, कारळ. ३०, लवंग १०, हळद ५०, मीठ ५ रुपये असा एकूण ९०० रुपयांपर्यंत खर्च येऊन चटपटीत असे लोणचे तयार होते.

...

मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन व कोविडची भीती असल्याने आम्ही लोणचे केले नव्हते. पण यावर्षी आम्ही सर्व काळजी घेतली. घरगुती मसाले साहित्य वापरून १०० कैऱ्यांचे चटपटीत असे लोणचे तयार केले आहे. घरगुती लोणच्याची चव ही विकतच्या लोणच्यापेक्षा भारी असते.

-सारिका सुधीर नागापुरे, गृहिणी.

===Photopath===

220521\purusttam karva_img-20210522-wa0067_14.jpg~220521\purusttam karva_img-20210522-wa0063_14.jpg

Web Title: The taste of hand pickles is better than selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.