कोरोनावरील औषधे करमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:01+5:302021-04-26T04:30:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : महाराष्ट्रात कोरोनाची आपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनावरील उपचारांवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : महाराष्ट्रात कोरोनाची आपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनावरील उपचारांवर लाखो रुपये खर्च होत आहेत. अशास्थितीत सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी कोरोनाच्या उपचारासाठी अत्यावश्यक असणारी सर्व औषधे करमुक्त करावी, अशी मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट जोरात सुरू आहे. शहरी व ग्रामीण भागात दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. दररोज हजारो रूग्ण सापडत आहेत तर कोरोनामुळे मृत्यूंच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अनेक कुटुंब कोरोनाची शिकार बनली आहेत. दररोज अनेक कुटुंबांना कोरोनाची लागण होऊ लागली आहे. सामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागतात. कोरोनाच्या औषधांचा खर्चही महागडा होत चालला आहे. वैद्यकीय उपचारासाठीही मोठा खर्च होऊ लागला आहे. अशास्थितीत सामान्य माणसाला होणारा आर्थिक खर्च परवडणारा नाही. यासाठी शासनाने कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यासाठी ही औषधे करमुक्त करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा. यामुळे या संकटकाळी त्यांना मोठी मदत होऊन दिलासा मिळेल. कोरोनावरील औषधे करमुक्त करावीत, अशी मागणी बसव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.