भावनांचे करा व्यवस्थापन; आज आयएमएचे ऑनलाईन वर्कशॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:33 AM2021-05-16T04:33:13+5:302021-05-16T04:33:13+5:30

जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने लॉकडाऊन केले. त्यामुळे शाळा बंद झाल्या. व्यापारपेठ बंद झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडली. ...

Tax management of emotions; IMA's online workshop today | भावनांचे करा व्यवस्थापन; आज आयएमएचे ऑनलाईन वर्कशॉप

भावनांचे करा व्यवस्थापन; आज आयएमएचे ऑनलाईन वर्कशॉप

Next

जिल्ह्यात मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने लॉकडाऊन केले. त्यामुळे शाळा बंद झाल्या. व्यापारपेठ बंद झाल्याने अर्थव्यवस्था कोलमडली. घरात बसून लोकही वैतागले. अनेकांना मानसोपचार तज्ज्ञांकडे जावे लागले. याबरोबरच काही लोकांना बाधित आढळल्याने काेरोना वॉर्डमध्ये जावे लागले. खासगी व सरकारी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला. कुटुंबीयांना वेळ देता येईना. अशा असंख्य भावनांचे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे लोक तणावात असून चिडचिडेपणा वाढला आहे. याच भावनांचे नियोजन करता यावे, या दृष्टीनेच आयएमएने ऑनलाईन मार्गदर्शन ठेवले आहे. औरंगाबाद येथील मनोविश्लेषक व समुपदेशक डॉ. संदीप शिसोदे हे रविवारी दुपारी साडे चारवाजता मार्गदर्शन व समुपदेशन करणार आहेत. यासाठी आयएमएकडून लिंक दिली जाणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर यांनी केले आहे.

Web Title: Tax management of emotions; IMA's online workshop today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.