शिक्षक हा सर्वोकृष्ट सामाजिक अभियंता आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:33+5:302021-09-10T04:40:33+5:30
माजलगाव : शिक्षक हा क्षमाशील, नीतिवान तसेच चारित्र्यसंपन्न असला पाहिजे. कारण, त्याच्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर म्हणजेच समाजावर ...
माजलगाव : शिक्षक हा क्षमाशील, नीतिवान तसेच चारित्र्यसंपन्न असला पाहिजे. कारण, त्याच्या प्रत्येक कृतीचा परिणाम हा विद्यार्थ्यांवर म्हणजेच समाजावर होत असतो. म्हणूनच, शिक्षक हा सर्वोत्कृष्ट सामाजिक अभियंता आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते प्रा. लक्ष्मीकांत सोन्नर यांनी केले. ते श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभय कोकड, प्राचार्य डॉ. महेश देशमुख, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळये, प्रा. संतोष लिंबकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी केले. या कार्यक्रमात प्रा.डॉ. साधना घडसिंग यांची पीएच.डी. मार्गदर्शकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अभय कोकड म्हणाले की, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कार्यक्रमाचे सांघिक पद्य प्रा. अंकुश साबळे यांनी सादर केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. कमलकिशोर लड्डा यांनी केले. तसेच वैयक्तिक पद्य व पसायदान प्रा.डॉ. रमेश गटकळ यांनी सादर केले. प्रा. गंगाधर उषमवार यांनी आभार मानले.