अगोदर जेवल्याने शिक्षक पत्नीचे बुक्की मारून पाडले दात...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:19 AM2019-01-12T00:19:01+5:302019-01-12T00:19:29+5:30
अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अनुरथ मारुती मोरे (तेलगाव, ता. धारुर, ह. मु. उदयनगर, धारुर) असे मारहाण करणाऱ्या शिक्षक पतीचे नाव आहे. अनुरथ हा चोंडी गावातील वस्तीवर शिक्षक आहे, तर त्याची पत्नी गावंदरा येथील जि. प. शाळेवर शिक्षिका आहेत. ७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता शिक्षिकेने भाऊ आल्यामुळे त्याच्यासोबत जेवण केले. नोकरीवरुन आलेल्या अनुरथला पत्नी आपल्याअगोदर जेवल्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एक बुक्की तोंडावर बसल्याने शिक्षक पत्नीचे समोरील दात पडले. त्यानंतर तिला मुलासह घराबाहेर हाकलून दिले. उपचार घेतल्यानंतर १० जानेवारी रोजी शिक्षक पत्नीने धारुर पोलीस ठाणे गाठून अनुरथ विरोधात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. अद्यापही शिक्षक पतीला अटक नाही. सहाय्यक फौजदार आर. के. जाधव हे तपास करीत आहेत.