विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी कार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:48+5:302021-03-19T04:32:48+5:30
धारूर : शिक्षकानी शाळेत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे, शाळा आदर्श कराव्यात, असे आवाहन देवदहीफळ केंद्रातील शिक्षकांच्या ...
धारूर : शिक्षकानी शाळेत विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कार्य करावे, शाळा आदर्श कराव्यात, असे आवाहन देवदहीफळ केंद्रातील शिक्षकांच्या बैठकीत गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.
१८ मार्च २१ रोजी धारूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा देव दहिफळ येथे आधार नोंदणी, विद्यार्थी स्वाध्याय सोडवणूक प्रमाण कमी असल्याने गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, केंद्राचे केंद्रप्रमुख सुरवशे, केंद्रीय मुख्याध्यापक जाधव यांच्या उपस्थितीत शिक्षकांची बैठक घेतली. केंद्रातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना एकत्र बोलून शाळा निहाय विद्यार्थी आधार नोंदणी, शाळा निहाय विद्यार्थ्यामार्फत सोडविले जाणारे स्वाध्याय यांचा आढावा घेऊन ३१ मार्च २१ पर्यंत आधार नोंदणीचे प्रमाण शंभर टक्के होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडील यांनी विद्यार्थी वैयक्तिक लाभाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून सर्व शाळांनी तात्काळ समायोजन दाखल करण्याबाबत सांगितले.
आमला शाळेचे मुख्याध्यापक तरके यांनी विद्यार्थ्याला दैनंदिन स्वाध्याय कसे द्यावेत, स्वाध्यायाची सोडवणूक कशी करून घ्यावी, याबाबत प्रात्यक्षिक सादर केले.
केंद्रप्रमुख सुरवशे व केंद्रीय मुख्याध्यापक जाधव यांनी मूळ व दुय्यम सेवा पुस्तिका अद्ययावत करण्यासाठी सव्वीस मुद्द्यांच्या पत्राचे वाचन करून त्याच्या नोंदी सेवापुस्तिका कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव यांनी तर आभार प्रदर्शन होन सांगडे यांनी केले
===Photopath===
180321\img-20210318-wa0140_14.jpg
===Caption===
गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अंडील, केंद्राचे केंद्रप्रमुख सुरवशे, केंद्रीय मुख्याध्यापक जाधव यांच्या उपस्थितीत देवदहीफळ केंद्रात शिक्षकांची बैठक घेतली.