समाज माध्यमावर संदेश देऊन पथक दारू पकडण्यासाठी रवाना - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:02+5:302021-07-18T04:24:02+5:30

त्याचे झाले असे की, आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत अवैध धंदे रोखण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. ...

The team left to catch alcohol by sending a message on social media - A - A | समाज माध्यमावर संदेश देऊन पथक दारू पकडण्यासाठी रवाना - A - A

समाज माध्यमावर संदेश देऊन पथक दारू पकडण्यासाठी रवाना - A - A

Next

त्याचे झाले असे की, आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत अवैध धंदे रोखण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. हे पथक आष्टी, पाटोदा, शिरूर या तीन तालुक्यांतील आष्टी, पाटोदा, शिरूर, अमळनेर, अंभोरा, कडा पोलीस चौकी या पोलीस ठाण्याअंतर्गत काम करत आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे जोमात सुरू असताना नावापुरती कारवाई केली जाते. बाकी दरमहा आलबेल असते. त्यामुळे पोलिसाचा किती वचक आहे, हे जनतेला सांगायची गरज नाही; पण चक्क या पथकाने आज एक वेगळाच प्रताप केला आहे.

गुरुवारी हे पथक जेव्हा सकाळी १२ वाजता चारचाकी वाहन घेऊन कारवाई करण्यासाठी निघाले तेव्हा गुप्त पद्धतीने किंवा अचानक धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित असते; पण या पथकातील कर्मचाऱ्यांनी चक्क आपल्या मोबाइलवर ‘अवैध दारू पकडण्यासाठी पथक रवाना’ असे स्टेट्स टाकल्याने नेमके यातून काय साध्य करायचे, हे समजले नाही. याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे. याबाबत पोलीस कर्मचारी म्हणाले की, केळसांगवी येथील महिलांची तक्रार आली होती; पण दिवसभरात कसलीच कारवाई झाली नाही. दरम्यान या संदर्भात मला कसलीच माहिती नाही चौकशी करून पाहतो, असे उपाधीक्षक विजय लगारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

150721\10563226nitin kmble_img-20210715-wa0044_14.jpg

Web Title: The team left to catch alcohol by sending a message on social media - A - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.