बी-बियाणांच्या विक्री नियंत्रणासाठी झाली पथकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:23 AM2021-06-11T04:23:09+5:302021-06-11T04:23:09+5:30
त्यानुसार सदरील निवेदनाची उपजिल्हाधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी बीड यांना पत्राद्वारे कार्यवाही करण्याचे कळविले आहे. सध्या ...
त्यानुसार सदरील निवेदनाची उपजिल्हाधिकारी यांनी तत्काळ दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी बीड यांना पत्राद्वारे कार्यवाही करण्याचे कळविले आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू झालेला असून शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानावर गेले असता चढ्या भावाने बियाणे विक्री केली जात आहे. शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असताना अशा प्रकारची पिळवणूक होत आहे. तसेच कुठल्याही कृषी दुकानावर बी-बियाणे, खते, औषधे याचे अधिकृत भावफलक लावलेले नाहीत.
संबंधित कृषी दुकानावर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे निदर्शनात आले असून जिल्हा कृषी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. माजी. आ. भीमसेन धोंडे यांनी आष्टी, पाटोदा, शिरुर का. तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या असता बहुसंख्य शेतकऱ्यांनी तक्रारी करत बी-बियाणे, खते व औषधे चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे प्रत्येक कृषी दुकानावर महसूल व कृषी विभागाने आपले कर्मचारी नेमून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बी-बियाणे, खते व औषधे शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्री करावी. तसेच विशेष पिके कांदा, उडीद, मूग, तूर, सोयाबीन व इतर बी-बियाणांचे भावफलक लावून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी धोंडे यांनी केली होती.
===Photopath===
100621\img-20210610-wa0322_14.jpg