टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ‘टेक्निशिअन’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:59 PM2019-02-11T23:59:00+5:302019-02-11T23:59:35+5:30

खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅट-या चोरल्या.

The technician's thief, the thief of the tower, thieves | टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ‘टेक्निशिअन’ गजाआड

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणारे ‘टेक्निशिअन’ गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देदोन गुन्हे उघड : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड : खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून रूजू झाले. काही दिवस चांगले काम केले. नंतर त्यांनी कामातील ‘टेक्निक’ चोरीसाठी वापरली. जेथे काम करीत होते, तेथीलच बॅट-या चोरल्या. अशा बॅट-या चोरणारे दोन ‘टेक्निशिअन’ स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहेत. त्यांनी दोन गुन्हेही कबुल केल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
भाऊसाहेब हरिश्चंद्र हंडिबाग (३२, रा.केज) व सुनील भगवान नेहरकर (२२ रा. धावडी ता. अंबाजोगाई) अशी पकडलेल्या दोन चोरांची नावे आहेत. त्यांचा अन्य एक सहकारी अद्यापही फरार आहे.
केज, अंबाजोगाई, धारूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून टॉवरच्या बॅटºया चोरीचे गुन्हे वाढले होते. धारूर, युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तशी नोंदही झाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास हाती घेतला. सपोनि अमोल धस यांनी कौशल्यपूर्ण तपास करून दोघांना ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हे कबूल केले.
दरम्यान, दोन्ही चोरटे खाजगी दूरसंचार कंपनीच्या टॉवर विभागात ‘टेक्निशिअन’ म्हणून कार्यरत होते. त्यांना काय केल्यावर काय होऊ शकते, याची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी चार बॅटºया असतील तर तीन चोरायच्या आणि एक जागेवर ठेवायची. शेवटच्या बॅटरीची चार्जिंग संपल्यानंतर संबंधित कंपनीला संदेश जायचा. तोपर्यंत या चोरांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली असायची. मात्र एलसीबीच्या तावडीतून ते सुटू शकले नाहीत. त्यांचा अन्य एक साथीदार अद्यापही फरार असून, त्याला लवकरच ताब्यात घेऊ, असे सपोनि धस यांनी सांगितले. सध्या दोन्ही चोरटे धारूर पोलिसांच्या ताब्यात आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, भास्कर केंद्रे, कल्याण तांदळे, राजू वंजारे आदींनी केली.

Web Title: The technician's thief, the thief of the tower, thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.