तहसीलच्या पथकाने काढले दुकानासमोर गोल, सुरक्षित अंतर ठेवण्याचा व्यापाऱ्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:33 AM2021-04-08T04:33:53+5:302021-04-08T04:33:53+5:30

: शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे येथील प्रशासन जागे झाले असून त्यांनी मोंढ्यातील दुकानांसमोर अंतरा अंतरावर गोल ...

Tehsil team advises traders to keep round, safe distance in front of the shop | तहसीलच्या पथकाने काढले दुकानासमोर गोल, सुरक्षित अंतर ठेवण्याचा व्यापाऱ्यांना सल्ला

तहसीलच्या पथकाने काढले दुकानासमोर गोल, सुरक्षित अंतर ठेवण्याचा व्यापाऱ्यांना सल्ला

googlenewsNext

: शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे येथील प्रशासन जागे झाले असून त्यांनी मोंढ्यातील दुकानांसमोर अंतरा अंतरावर गोल काढून सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

बीड जिल्ह्यात मागील १५-२० दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

यामुळे प्रशासन हादरून गेले असून ते दररोज वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. माजलगाव तहसील कार्यालयाकडून कोविड आपत्ती व्यवस्थापन पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक व्यापाऱ्यांकडे जाऊन त्यांच्या दुकानासमोर अंतर ठेवून गोल काढून या गोलमध्ये ग्राहकांना उभे राहण्यास सांगा व सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देखील देत आहेत. यामुळे गोल काढत काढत या पथकाकडून जनजागृती देखील केली जात आहे.

या पथकात महसूल विभाग नायब तहसीलदार अशोक भंडारे, तलाठी दिगांबर तांदळे, राहुल वाघचौरे, रामकृष्ण इंगळे, सोपान वाघमारे, शिवहर शेटे, विलेश कांबळे व शंकर चव्हाण आदींचा सहभाग आहे.

===Photopath===

070421\purusttam karva_img-20210406-wa0030_14.jpg

Web Title: Tehsil team advises traders to keep round, safe distance in front of the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.