तहसीलदारांनी केली नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:06+5:302021-09-16T04:42:06+5:30

बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहत ...

Tehsildar demands suspension of Deputy Tehsildar | तहसीलदारांनी केली नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

तहसीलदारांनी केली नायब तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

Next

बीड : गेवराई तहसीलमध्ये महसूल १ या पदावर कार्यरत असलेले नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे विनापरवानगी कार्यालयात गैरहजर राहत असून, मुख्यालय सोडताना अवगत करीत नाहीत. यासह विविध कारणांस्तव कामकाजावर परिणाम होत असून, त्यांचे निलंबन करावे, अन्यथा इतर ठिकाणी बदली करावी, अशी मागणीच गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गेवराई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रशांत जाधवर हे महसूल १ या पदावर कार्यरत आहेत. ते त्यांची कामे व्यवस्थित पार पाडत नाहीत असा ठपका तहसीलदार खाडे यांनी ठेवला आहे, तर, महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष करणे, कार्यालयात अरेरावी करणे शासकीय कामात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा व निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाहीत. त्यावर त्यांना वेळोवेळी सूचना देऊनदेखील जाधवर यांच्या वर्तनात बदल झालेला नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन किंवा इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी तहसीलदार सचिन खाडे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यांची गंभीर दखल घेतली असून, सर्व मुद्द्यांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस जाधवर यांना पाठविण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा न दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Tehsildar demands suspension of Deputy Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.