कोरोना नियंत्रणासाठी तहसीलदारांनी घेतली काठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:16+5:302021-08-01T04:31:16+5:30
शिरूर तालुका हा अधिकाऱ्यांबाबतीत प्रभारी असल्याने यंत्रणा खिळखिळी झाल्याचे सतत अनुभवास येते. मात्र, तहसीलदार यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील ...
शिरूर तालुका हा अधिकाऱ्यांबाबतीत प्रभारी असल्याने यंत्रणा खिळखिळी झाल्याचे सतत अनुभवास येते. मात्र, तहसीलदार यावर मात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील दिसले. अस्थापना चालू ठेवण्यासाठी वेळ ठरवून दिलेली असताना ग्राहकाच्या मोहापायी दुकानदार वेळेचे बंधन पाळत नाहीत तर काही मागच्या दाराने ग्राहकी करीत आहेत, तर काही दुकानाच्या दारातच बसतात. ग्राहक आले तर लागलीच कामापुरते शटर वर केले जाते. फोनवर सुद्धा संपर्क करून माल विक्री केला जातो. अनेक वेळा अनेक दुकानदारांनी दंडदेखील भरला. मात्र, दंड भरला की तो पुन्हा वसूल करण्यासाठी तोच मार्ग अवलंबत असल्याचेही दिसून येते. आता मात्र कोरोना पुन्हा उसळी घेत असल्याने शासन आदेशाप्रमाणे नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याने तहसीलदार रस्त्यावर उतरले.
नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. विना मास्क, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर या बाबी गांभीर्यपूर्वक घेणे गरजेचे असून, जनतेने सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.
310721\1737-img-20210731-wa0016.jpg
शिरूरमधे तहसिलदार कडक लाकडाऊनची अंमलबजावणी करतांना