सावंतवाडी टोलनाक्याजवळ दारूचा टेम्पो लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:39+5:302021-08-29T04:32:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केज : केज - बीड राष्ट्रीय महामार्गावरील सावंतवाडी टोलनाक्याजवळ वाटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : केज - बीड राष्ट्रीय महामार्गावरील सावंतवाडी टोलनाक्याजवळ वाटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शुक्रवारी मध्यरात्री सावंतवाडी टोलनाक्याजवळ मांजरसुंब्याकडे जात असलेल्या टेम्पोची अज्ञात चोरट्यांनी ताडपत्री फाडून त्यातील ८० हजार रुपये किमतीची विदेशी बनावटीची दारू पळविली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद येथून केजमार्गे मांजरसुंब्याकडे जाणारा टेम्पो (क्र. एमएच ०५ डीके ०४०७) हा शुक्रवारी मध्यरात्री बारा ते साडेबारा वाजेदरम्यान केज-बीड रस्त्याने जात होता. सावंतवाडी टोल नाक्याजवळ रस्ता खराब असल्याने टेम्पोची गती कमी झाल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी टेम्पोवर चढून धारदार शस्त्रांनी ताडपत्री फाडून त्यातील विदेशी दारूचे १२ बाॅक्स लुटले. या दारूची किंमत ८० हजार ७४८ रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात वाहनचालक लक्ष्मण गोविंद पाटील यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी ठाणे प्रमुख सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
टोल नाक्याजवळ लुटीच्या घटनेत वाढ
केजपासून पाच किलोमीटर अंतरावरील सावंतवाडी टोलनाक्यावर लुटीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरू लागल्याने टोलनाक्यावरील लुटीच्या घटना थांबविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
टोलनाक्याजवळ लुटीच्या घटनेत वाढ
केजपासून पाच किलोमीटर अंतरावरील सावंतवाडी टोलनाक्यावर लुटीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरू लागल्याने टोलनाक्यावरील लुटीच्या घटना थांबविण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
280821\img-20210828-wa0008.jpg
सावंतवाडी टोलनाक्यावर याच टेम्पोतील ८० हजार रु. ची दारू ताडपत्री फाडून अज्ञात चोरट्यानी पळविली