स्वस्त धान्य दुकान वाटपासाठीची ई-पॉस प्रणाली तात्पुरती स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:36+5:302021-04-28T04:36:36+5:30
यावेळी दिलेल्या पत्रकात आ. धस यांनी ई-पॉस प्रणाली ही धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आजवरची सर्वांत प्रभावी यंत्रणा ठरलेली आहे. मात्र, ...
यावेळी दिलेल्या पत्रकात आ. धस यांनी ई-पॉस प्रणाली ही धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आजवरची सर्वांत प्रभावी यंत्रणा ठरलेली आहे. मात्र, सद्य:स्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही प्रणाली काही कालावधीसाठी स्थगित करून त्याऐवजी स्वस्त धान्य दुकान परवानाधारक ते नायब तहसीलदार पुरवठा अधिकारी ते जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करून दुकानदाराने ग्राहकाला धान्य वाटप केल्याबाबतचे फोटो पाठवावेत किंवा तत्सम उपाययोजना करण्यात याव्यात. जेणेकरून धान्य वाटपामध्ये गैरप्रकार होणार नाहीत. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मोठी मदत या माध्यमातून होईल. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये देखील रुग्णांची वाढती संख्या भयावह आहे. ही कोविड महामारी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून ई-पॉस (थंब इम्प्रेशन) प्रणाली तात्पुरती स्थगित करण्याची मागणी आ. धस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे.