बीड जिल्ह्यात दहा दिवस लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:35+5:302021-03-25T04:31:35+5:30
बीड : वाढते कोरोना रुग्ण लक्षात बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या रात्री बारा वाजेपासून ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्णपणे लॉक ...
बीड : वाढते कोरोना रुग्ण लक्षात बीड जिल्ह्यात २५ मार्चच्या रात्री बारा वाजेपासून ते ४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्णपणे लॉक डाऊन असेल. या काळात शासकीय कार्यालये वगळता इतर सर्व खासगी कार्यालये, बांधकाम बंद राहतील. बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी किंवा येण्यासाठी अँटिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर बंधनकारक असेल, अशी घोषणा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २४ मार्च रोजी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राज, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित होते.
जगताप यांनी सांगितले की, या दहा दिवसात बीड जिल्ह्यातील क्रीडा संकुल, जिम, स्विमिंग पूल, उपहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालय, प्रशिक्षण संस्था, शिकवण्या बंद असतील. सार्वजनिक, खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी वाहने बंद असतील. सर्व प्रकारची बांधकामे, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, नाट्यगृह बंद असतील. मंगल कार्यालय, हॉल, स्वागत समारंभ बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे, सार्वजनिक प्रार्थनास्थळ बंद असतील. खासगी कार्यालये बंद असतील. दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजिंगची कामे तीन व्यक्तींना करण्यास परवानगी असेल.
===Photopath===
240321\24bed_19_24032021_14.jpg
===Caption===
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राज, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत कुंभार उपस्थित होते.