दहा महिन्यांत बीड जिल्ह्यातील १६२ बालके कुपोषणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:15 AM2018-02-10T01:15:16+5:302018-02-10T01:16:04+5:30
बीड जिल्ह्यात मध्यंतरी कुपोषित बालके वाढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. जी बालके जिल्हा रूग्णालयात दाखल झाली, त्यांच्यावर विशेष कक्षात औषधोपचार करून त्यांना कुपोषणमुक्त करून घरी पाठविले. दहा महिन्यात १६२ तीव्र कुपोषित बालके कुपोषणमुक्त झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात मध्यंतरी कुपोषित बालके वाढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. जी बालके जिल्हा रूग्णालयात दाखल झाली, त्यांच्यावर विशेष कक्षात औषधोपचार करून त्यांना कुपोषणमुक्त करून घरी पाठविले. दहा महिन्यात १६२ तीव्र कुपोषित बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आकडा कमी होत असल्याचे सांगण्यात आले.
माजलगाव येथील एका पालावर एका कुटूंबात दोन बालके कुपोषित आढळल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याबाबत माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. प्रत्येक आंगणवाड्यांसह पालांवर जावून बालकांच्या तपासणीचे आदेश दिले. विशेष पथके नियुक्त केली. यामध्ये अनेक बालके तीव्र व मध्यम कुपोषित आढळली होती. यातील १६२ बालके जिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती.
या बालकांवर विशेष कक्ष क्रमांक ९ मध्ये (१० खाट) उपचार करण्यात आले. तसेच मातांचे समुपदेशन करून बालकांना पोषक आहार देण्यात आला. १४ दिवस ही प्रक्रिया झाल्यानंतर ही सर्व बालके कुपोषणमुक्त होऊन घरी परतल्याचे डॉ.हनुमंत पारखे यांनी सांगितले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, डॉ. सतीष हरीदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हनुमंत पारखे, डॉ. दीपक लांडे, डॉ. योगेश जाधव, आहारतज्ज्ञ सावित्री कचरे यांच्यासह कक्षातील सर्व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
मातांना भत्ता आणि जेवण
रूग्णालयात दाखल असलेल्या कुपोषित बालक रूग्णांच्या मातांना (किंवा नातेवाईकांना एका) ५० रूपये भत्ता दिला जातो. तसेच त्यांना सकाळी नाश्तासह दोन वेळा जेवन दिले जाते. त्यामुळे रूग्णालयात दाखल होणाºया रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. नागरिकांनीही मुलांना कुपोषणाची लक्षणे दिसताच दाखल करावे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले आहे.