योगेश्वरी देवस्थानतर्फे स्वारातीला दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:01+5:302021-06-09T04:42:01+5:30

रुग्णांच्या उपचाराची सोय व्हावी या हेतूने देवस्थानतर्फे या मशीन देण्याचे निश्चित केले होते. योगेश्वरी मंदिराच्या प्रांगणातच या मशीन रीतसर ...

Ten Oxygen Concentrator Machine at Swarati by Yogeshwari Devasthan | योगेश्वरी देवस्थानतर्फे स्वारातीला दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन

योगेश्वरी देवस्थानतर्फे स्वारातीला दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन

Next

रुग्णांच्या उपचाराची सोय व्हावी या हेतूने देवस्थानतर्फे या मशीन देण्याचे निश्चित केले होते.

योगेश्वरी मंदिराच्या प्रांगणातच या मशीन रीतसर स्वारातीच्या प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर, अधीक्षक डॉ. राकेश जाधव, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

समितीचे सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, संचालक भगवानराव शिंदे, उपाध्यक्ष गिरीधारीलाल भराडिया, कमलाकर चौसाळकर, सुनील लोमटे, श्रीराम देशपांडे यांची उपस्थिती होती.

ही मशीन खूप उपयोगी असून अतिदक्षता विभागात असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडल्यास त्याचा उपयोग होतो. हवेतील ऑक्सिजन घेऊन हे यंत्र रुग्णाला पुरवते, त्यामुळे देवल समितीने स्वारातीसाठी खूप महत्त्वाची भेट देऊन मदत केली असल्याचे डॉ. बिराजदार यांनी सांगितले.

साडेपाच लाखांचा निधी

या दहा ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीनसाठी देवल समितीने ५ लाख ६० हजार रुपये निधी खर्च केला आहे. या मशीनमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याचे ॲड. शरद लोमटे यांनी सांगितले.

===Photopath===

080621\img-20210606-wa0106_14.jpg

Web Title: Ten Oxygen Concentrator Machine at Swarati by Yogeshwari Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.