बीड जिल्ह्यात येणार दहा हजार रेमडेसिविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:54+5:302021-04-17T04:33:54+5:30

परळी : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांची रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाइकांची होणारी धावपळ थांबावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ...

Ten thousand remedies will come to Beed district | बीड जिल्ह्यात येणार दहा हजार रेमडेसिविर

बीड जिल्ह्यात येणार दहा हजार रेमडेसिविर

Next

परळी : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांची रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी नातेवाइकांची होणारी धावपळ थांबावी, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन जिल्ह्यात उपलब्ध होणार आहेत.

परळी मतदारसंघात शासन नियमाच्या अधीन राहून ३ हजार रेमडेसिविर उपलब्ध होणार असून, परळी शहरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानमार्फत हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार मोफत उपलब्ध करून देणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा व पर्यायाने काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये औषध प्रशासन विभागामार्फत आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करण्यात येतात; मात्र खासगी रुग्णालयांमध्ये मात्र रुग्ण व नातेवाइकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी औषध प्रशासन विभाग, उत्पादक व वितरक यांच्याशी समन्वय साधून शासन नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यासाठी आगाऊ १० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली केल्या आहेत. हे इंजेक्शन शासकीय यंत्रणेद्वारे वितरकांमार्फत खासगी रुग्णालय व नातेवाइकांना दिली जाणार आहेत.

तीन हजार इंजेक्शन हे शासन नियमाच्या अधीन राहून परळी मतदारसंघातील गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील व या इंजेक्शनचा नाथ प्रतिष्ठानमार्फत केला जाईल, अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पालकमंत्र्यांचे कोरोना हेल्प सेंटर

दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामार्फत मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या कोरोना हेल्प सेंटरच्या माध्यमातून अविरत रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना बेड, गरजेनुसार ऑक्सिजन-व्हेंटिलेटर, रेमडेसिविर आदी उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे हे कार्य सुरूच आहे. यामार्फत हजारो रुग्णांना मदत करण्यात येत आहे. धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यासह परळीतील रा. कॉं. चे प्रमुख पदाधिकारी व मुंडेंच्या कार्यालयातील कर्मचारी यासाठी अविरत प्रयत्नशील असून, परळी, बीडच नव्हे तर राज्यभरातून मदतीसाठी फोन येतात व त्यांना मदत केली जाते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये विविध योजनांचा लाभ तसेच बिलात सवलत मिळवून देणे याबाबतचीही अनेक उदाहरणे या हेल्प सेंटरच्या माध्यमातून समोर आली आहेत, तसेच स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या नावे सर्व सुविधायुक्त ५० बेडचे कोविड केअर सेंटरदेखील उभारण्यात येत आहे.

Web Title: Ten thousand remedies will come to Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.