सावरगावच्या गोदापात्रात वाळूचे दहा ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:43+5:302021-05-08T04:35:43+5:30
गेवराई : तालुक्यातील सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असताना पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक व गेवराई पोलिसांनी ...
गेवराई : तालुक्यातील सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असताना पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक व गेवराई पोलिसांनी धाड टाकून केलेल्या संयुक्त कारवाईत दहा ट्रॅक्टर वाळू भरत असताना पकडले. शुक्रवारी दुपारी या कारवाईदरम्यान काही चालकांनी ट्रॅक्टरसह धूम ठोकली.
तालुक्यात अवैध वाळूचा उपसा काही केल्या थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील सावरगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक व गेवराई पोलिसांनी सावरगावच्या नदीपात्रात धाड टाकली. त्यावेळी अवैधरित्या वाळूचा उपसा करून ती ट्रॅक्टरमध्ये भरली जात होती. यावेळी पोलिसांनी कारवाई करत दहा ट्रॅक्टर पकडून ताब्यात घेतले. पकडलेले सर्व ट्रॅक्टर येथील पोलीस ठाण्यात लावले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षकांचे विशेष पथकाचे प्रमुख पो. नि. विलास हजारे, गेवराई ठाण्याचे पो. नि. रवींद्र पेरगुलवार,पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ,संभाजी भिल्लारे,स्वप्निल खाकरे,बालाजी बाटोक,शरद बहिरवाळ आदींनी केली. या कारवाईमुळे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
===Photopath===
070521\sakharam shinde_img-20210507-wa0050_14.jpg