निवडणूक काम करताना पकडल्या वाळूच्या दहा ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:17 AM2019-04-11T00:17:22+5:302019-04-11T00:17:45+5:30

तेलगावकडून धारूरकडे येणाऱ्या वाळुच्या दहा ट्रक धारूर तहसील प्रशासनाच्या पथकाने पकडल्या. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

Ten trucks seized while holding elections | निवडणूक काम करताना पकडल्या वाळूच्या दहा ट्रक

निवडणूक काम करताना पकडल्या वाळूच्या दहा ट्रक

Next

धारुर : तेलगावकडून धारूरकडे येणाऱ्या वाळुच्या दहा ट्रक धारूर तहसील प्रशासनाच्या पथकाने पकडल्या. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. दहापैकी तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक केल्याचे निदर्शनास आल्याने ९ लाख २४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
बुधवारी सकाळी नायब तहसीलदार सुहास हजारे, वरिष्ठ लिपिक नजीर कुरेशी व त्यांचे पथक माजलगावकडे निवडणूक कामासाठी धारूर तेलगाव रस्त्याने जात होते. याच रस्त्याने वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक धारुरकडे येताना दिसून आल्या. या ट्रक परभणी जिल्ह््यातील मुदगल (ता. पाथरी) येथील साठ्या वरून भरून आल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. या सर्व ट्रक थांबवून चौकशी केली व त्या तहसील कार्यालयात लावण्यात आल्या. या ट्रकची व सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. तर इतर ट्रकमध्ये मात्र क्षमतेइतकीच वाहतूक होत होती. त्यांच्याकडे पावत्याही उपलब्ध होत्या. तीन ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्याप्रकरणी ९ लाख २४ हजार रु पये दंड प्रशासनाने वसूल केला.

Web Title: Ten trucks seized while holding elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.