५० लाखांचे ‘ते’ टेंडर स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:34 AM2021-09-11T04:34:58+5:302021-09-11T04:34:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : कृषी उत्पन्न बाजार समितीने रस्त्याचे काम करण्यासाठी ५० लक्ष रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : कृषी उत्पन्न बाजार समितीने रस्त्याचे काम करण्यासाठी ५० लक्ष रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. परंतु काही संचालकांनी तक्रार केल्यानंतर या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधकांंनी ते टेंडर प्रक्रियेस स्थगित करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आलेले आहेत.
धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामासाठी ५० लक्ष रुपयांचे टेंडर खुले केले होते. ई-टेंडर भरण्याची अखेरची मुदत १३ सप्टेंबरपर्यंत होती. परंतु येथील बाजार समिती संचालक चिंतामण सोळंके व अमोल जगताप यांनी टेंडर हे आम्हा संचालकाला विश्वासात घेतले नाही. टेंडर प्रक्रिया बोगस आहे. ठराव न घेताच टेंडर काढले असा आक्षेप घेत विभागीय सहाय्यक निबंधकांकडे लेखी तक्रार अर्ज करण्यात आला होता. यानुसार विभागीय निबंधकांनी यासंबंधी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी ८ सप्टेंबर रोजी यासंबंधी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी कळविले होते.
..
१६ सप्टेंबरला सुनावणी
धारूर येथील सहाय्यक निबंधक एस. डी. नेहरकर यांनी अर्जदार व बाजार समिती यांची १६ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी होईपर्यंत सदर टेंडर स्थगित करण्यात आले आहे. तशी नोटीस बाजार समिती सभापती, सचिवांना ९ सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे, असेही त्यांंनी सांगितले.