मराठीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 04:17 AM2020-03-05T04:17:18+5:302020-03-05T04:17:21+5:30
दहावीचा पेपर अवघड गेल्याने एका विद्यार्थिनीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कान्होबाचीवाडी येथे घडली.
Next
शिरूर कासार (जि. बीड ) : आपली मातृभाषा ही मराठी असली तरी त्याच विषयाचा दहावीचा पेपर अवघड गेल्याने एका विद्यार्थिनीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास कान्होबाचीवाडी येथे घडली. कोमल दिनकर कदम (१६) असे मयत मुलीचे नाव आहे.
कोमल ही गावातीलच होळकर विद्यालयाची विद्यार्थिनी होती. मंगळवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेतील मराठीचा पेपर अवघड गेल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
नातेवाईक युवराज कठाळे यांनी पोलिसांत तक्रार दिली.