'तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै...', धनंजय मुंडेंचे विरोधकांना खास शायरीतून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 11:47 AM2022-09-01T11:47:44+5:302022-09-01T11:48:22+5:30

नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे शानदार उद्घाटन

'Tere Lashkar ke mukabale Akela hoon mai...', Dhananjay Munde's challenge to his opponents through a shayari | 'तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै...', धनंजय मुंडेंचे विरोधकांना खास शायरीतून आव्हान

'तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै...', धनंजय मुंडेंचे विरोधकांना खास शायरीतून आव्हान

googlenewsNext

परळी ( बीड ) : मागील दोन वर्षात दोन वेळा कोरोना झाला, जवळची अनेक माणसे गमावली यासोबत अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सत्ता असो किंवा नसो आपण अशा संकटांना तोंड देण्यासाठी समर्थ आहोत, तसेच परळीच्या जनतेच्या सेवेत कोणत्याही संकटात असलो तरी कमी पडणार नाही,अशी ग्वाही माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

एवढेच नाही तर मुंडेंनी संकटांना आव्हान देत राहत इंदौरी यांची शायरी देखील आपल्या खास शैलीतून सादर केली, ते म्हणाले 
"राह मे खतरे बहुत है, लेकीन ठहरता कौन है?
मौत कल आती है, आज आ जाये, डरता कौन है?
तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै
मगर फैसला मैदान मे होगा की, मरता कौन है!"     

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाणच्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवाचे धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते  बुधवारी सायंकाळी शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. नाथ प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत त्यांच्या अडचणी सोडवायला व मदतीला आम्ही सदैव तत्पर असतो. दुष्काळात घरोघर पाणी पोहोच देणारे, कोरोनाच्या काळात सर्व जागी सर्व बाबींसाठी मदतकार्य करणारे नाथ प्रतिष्ठाण होते. या सेवा व्रतासोबतच वैद्यनाथ गणेशोत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून जनसेववची व सांस्कृतिक सेवेची परंपरा मागील 17 वर्षांपासून सुरू आहे, पुढेही ही परंपरा अखंड सुरू ठेऊ असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. 
या उदघाटन कार्यक्रमास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील उपस्थित होत्या, मागील 17 वर्षांपासून मी नाथ प्रतिष्ठाण आयोजित प्रत्येक कार्यक्रमास येत असून, धनु भाऊ हे पुढेही जेव्हा बोलावतील तेव्हा मी परळीत येईल, असेही त्या म्हणाल्या. 

यावेळी व्यासपीठावर अभिनेत्री स्पृहा जोशी, हेमांगी कवी, तेजा देवकर, प्राजक्ता गायकवाड, पूनम कुडाळकर यांचीही उपस्थिती होती. यासह आ. संजय भाऊ दौंड, राजकिशोर मोदी, अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, विष्णुपंत सोळंके, सौ. संगीताताई तुपसागर, लक्ष्मणतात्या पौळ, बालाजी (पिंटू) मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, दीपकनाना देशमुख, प्रा. विनोद जगतकर, शकील कुरेशी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आदी उपस्थित होते. सूत्र संचालन अनंत इंगळे आभार सचिव नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

उद्घाटन समारंभानंतर सर्व सिनेकलाकारांच्या समूहाने गणेशवंदना सादर केली व त्यानंतर लावण्यवतींचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. उपस्थित सर्वच सिनेतारकांनी एकापेक्षा एक कलांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.

Web Title: 'Tere Lashkar ke mukabale Akela hoon mai...', Dhananjay Munde's challenge to his opponents through a shayari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.