रस्त्यावर ट्रकच्या चाकातील हवा तपासणे बेतले जीवावर; कारने चालक-क्लिनरला चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:21 PM2022-07-19T23:21:20+5:302022-07-19T23:26:56+5:30

दोघांना चिरडल्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली

Testing the air in the truck's tires on the road took two life; The car crushed the driver-cleaner near Kaij | रस्त्यावर ट्रकच्या चाकातील हवा तपासणे बेतले जीवावर; कारने चालक-क्लिनरला चिरडले

रस्त्यावर ट्रकच्या चाकातील हवा तपासणे बेतले जीवावर; कारने चालक-क्लिनरला चिरडले

Next

केज ( बीड): केज-अंबाजोगाई रस्त्यावरील  चंदनसावरगाव बस स्थानकाजवळ ट्रकच्या चाकातील हवा तपासत असलेल्या चालक व क्लिनरला केजकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने चिरडल्याची धक्कादायक घटना आज रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. ताहेर हुसेन आणि इस्माईल अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेला राजस्थान येथील ट्रक (आर जे-११/जी बी-१०८६) हा चंदनसावरगाव येथील बस स्थानकालगत रस्त्याच्याकडेला थांबला होता. प्रवासाला सुरुवात करण्याआधी ट्रकचे चालक व क्लिनर ताहेर हुसेन आणि इस्माईल हे खाली उतरून टायरमधील हवा तपासून पहात होते. याचवेळी अंबाजोगाईकडून भरधाव वेगाने केजकडे जाणाऱ्या कारने क्र. (एम एच-४४/०५१२) रस्त्यावर उभ्या असलेले ताहेर हुसेन आणि इस्माईल हे दोघे ट्रक चालक व क्लिनर जागीच ठार झाले. 

दरम्यान, दोघांना चिडल्यानंतर भरधाव कार रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात उलटली. यात कारमधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे दोघे ( रा. गोपाळपूर ता. धारूर ) गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच जखमींना १०८ रुग्णवाहिकेतुन रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचारासाठी आणले. तर युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक औटी, पोलीस नाईक बालासाहेब घोरपडे, कदम आणि वाहन चालक शहेनशहा यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Testing the air in the truck's tires on the road took two life; The car crushed the driver-cleaner near Kaij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.