ठाकरे, बोस यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:55+5:302021-01-25T04:33:55+5:30
बीड : येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्यालयात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांची संयुक्त ...
बीड : येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्यालयात स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. बीड तालुकाप्रमुख गोरख सिंघन, सेवानिवृत्त जिल्हा-कृषी अधिकारी अरुण पंडित, प्रल्हाद वाघमारे, कुणाल जाधव, प्रशांत पंडित, पांडुरंग पंडित, दिलीप वाघमारे आदी उपस्थित होते.
सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे. सामान्य ग्राहक बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
भिंती रंगलेल्याच
बीड : शासकीय कार्यालयाच्या भिंतींवर ‘येथे थुंकू नये’ अशा सूचना लिहिलेल्या असतात, परंतु त्याच कार्यालयातील कर्मचारी व नागरिकांकडून त्याचे सातत्याने उल्लंघन होते. परिणामी, शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगलेल्याच दिसतात. कारवाईची मागणी आहे.
हातगाडे रस्त्यावर
गेवराई : शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.
पार्किंग कोलमडली
वडवणी : शहरातील प्रमुख मार्गावरील पार्किंग व्यवस्था कोलमडली असल्याने कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अनेक वेळा वाहनधारकांना पंधरा-पंधरा मिनिटे कोंडीत अडकून पडावे लागत आहे. वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
दीड किमी रस्त्यावर जागोजागी खड्डे
गेवराई : शिरसदेवी फाट्यापासून ते गावात जाणारा रस्ता दीड किलोमीटरचा आहे. सदरील रस्ता अत्यंत खराब झाला असून, जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. दुरुस्तीची मागणी राहुल शिंदे, अशोक पंडित यांनी केली आहे.
मोबाइल रेंज मिळेना
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागांत काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने, ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करूनही संबंधितांनी दखल घेतलेली नाही. रेंज मिळण्यासाठी दुरुस्तीची मागणी आहे.