५ जानेवारीला कुंभार समाजाचा थापटन मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:27 AM2021-01-02T04:27:32+5:302021-01-02T04:27:32+5:30
संत गोरोबाकाका माती कला बोर्डामध्ये ५० कोटी निधीची तरतूद करावी, घोषणा केल्याप्रमाणे केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग यांच्या वतीने प्रलंबित ...
संत गोरोबाकाका माती कला बोर्डामध्ये ५० कोटी निधीची तरतूद करावी, घोषणा केल्याप्रमाणे केंद्रीय खादी आणि ग्रामोद्योग यांच्या वतीने प्रलंबित १० हजार यांत्रिक चाके अनुदान तत्त्वावर द्यावेत, महाराष्ट्र शासनाने कुंभार समाजाचा एन. टी. प्रवर्गामध्ये समावेश करावा, संत गोरोबाकाका यांचे जन्मस्थान तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद या तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा द्यावा, माती वाहतूक व वीटभट्टी परवान्यांच्या जाचक अटी रद्द कराव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दळे यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष जालिंदर करडकर, विभागीय उपाध्यक्ष जालिंदर रेळेकर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वाडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक उद्धवराव विभुते, सोशल मीडिया प्रमुख अशोक राऊत, जिल्हा संघटक मनोहर इटकर, जिल्हा सरचिटणीस अनिल देवतरासे, माजी जिल्हाध्यक्ष राम पोपळे, ज्येष्ठ मार्गदर्शक गौतम चित्रे, ॲड. शिवराज कुंभार, उत्तरेश्वर तडसकर, विठ्ठल गोरे, रावसाहेब देशमुख आदींनी केले आहे.