समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर थापी- टोकरा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 02:26 PM2018-10-29T14:26:24+5:302018-10-29T14:27:37+5:30

बांधकाम मजूर, मिस्त्री आणि व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी आज दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने थापी-टोकारा मोर्चा काढला.

Thapi-Thokara Morcha on the sub-divisional office on behalf of the Samajwadi Party | समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर थापी- टोकरा मोर्चा

समाजवादी पार्टीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर थापी- टोकरा मोर्चा

googlenewsNext

माजलगाव (बीड ) : बांधकाम मजूर, मिस्त्री आणि व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी आज दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने थापी-टोकारा मोर्चा काढला.  

तालुक्यातील बांधकाम व्यावसायिक,  मजूर आणि मिस्त्री हे सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे समाजवादी पार्टीच्या वतीने बांधकाम व्यावसायिक,  मजूर आणि मिस्त्री यांनी आज दुपारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर समाजवादी पार्टीच्या वतीने थापी-टोकारा मोर्चा काढला. आंदोलकांनी तहसीलदार एन. जी. झंपडवार यांना निवेदन दिले. 

यात राज्य शासनाचे वाळूबाबतचे धोरण चुकीचे आहे, मध्यप्रदेश व तेलंगणा प्रमाणे याचा लिलाव व्हावा, १२ महिने वाळू उपसा सुरु ठेवावा, दुष्काळ असल्याने बांधकाम मजुरास २५ हजाराची मदत द्यावी, घरकुल योजनेतील वाळूवर कर लावू नये या व अन्य मागण्यांचा समावेश आहे. 

Web Title: Thapi-Thokara Morcha on the sub-divisional office on behalf of the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.