'पैसे दे नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव'; दोन वर्षांपासून बलात्कार, फोटो व्हायरल करताच पीडितेने घेतले विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 14:39 IST2025-04-12T14:37:36+5:302025-04-12T14:39:31+5:30

बीड जिल्ह्यात आरोपीने दोन वर्षे महिलेने बलात्कार केला, नकार दिल्यानंतर व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर केले त्यामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला

the accused raped a woman for two years In Beed, after she refused, he shared the nude video and photos on social media, due to which the victim attempted suicide | 'पैसे दे नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव'; दोन वर्षांपासून बलात्कार, फोटो व्हायरल करताच पीडितेने घेतले विष

'पैसे दे नाहीतर माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव'; दोन वर्षांपासून बलात्कार, फोटो व्हायरल करताच पीडितेने घेतले विष

Beed Crime News: 'तुझ्याकडे ऊसतोडीची असलेली बाकी दे किंवा शारीरिक संबंध ठेव. नसता मी तुझ्या पतीला मारून टाकेन.' ऊसतोड मजूर महिलेला त्याने दोन ते तीन वर्षांपूर्वी धमकी दिली. बरंवाईट करेल म्हणून ती घाबरली. तेव्हापासून तो तिच्यावर बलात्कार करत होता. पण, कंटाळून त्याने तिला शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. बदनामी व अत्याचाराला कंटाळून पीडितेने विष प्राशन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही घटना मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी (एप्रिल) पीडितेच्या तक्रारीवरून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस ठाण्यात अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाचा >>आशियाई महिलांसोबत सेक्स, तासाला ५० हजार; लक्झरी वेश्यालयात घोटाळ्यात अडकलेले भारतीय सीईओ कोण?

बीड जिल्ह्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावात ऊसतोड मजूर जोडपे हे अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते. 

पैसे दे नाहीतर माझ्याशी शरीरसंबंध ठेव

'तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव', म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने अत्याचार केला. त्याने फोटोही काढले. महिलेचे नग्न फोटो काढून भेटायला आली नाहीस तर सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशा धमक्या तो द्यायचा. त्यामुळे ती इच्छा नसताना त्याचे अत्याचार सहन करत होती. मागील दोन ते तीन वर्षांपासून हे सुरू होतं. 

तिने भेटण्यास टाळाटाळ केली अन्....

सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याचा राग धरून गावातीलच सोशल मीडियावर अमोल शिनगारे याने पीडितेचे नग्न फोटो व्हायरल केले. दरम्यान, हे पीडितेला कळले आणि तिला धक्काच बसला. या सगळ्यांना कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खासगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत.

घटना घडल्यानंतर आरोपी फरार 

दरम्यान, याबद्दल दिंद्रुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे यांनी सांगितले की, 'आरोपी फरार असून, त्याचा सर्व मार्गाने तपास करून शोध घेणे सुरू आहे. पोलिस यंत्रणा सर्वोतोपरी आरोपीच्या अटकेच्या प्रयत्नात आहे.'

नीलम गोन्हे यांचे एसपींना निर्देश

या प्रकरणाची दखल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-न्हे यांनी घेतली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना सखोल व तातडीची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

पीडितेला न्याय मिळावा, यासाठी सक्षम व अनुभवी सरकारी वकील नेमण्याची विनंती केली आहे. आरोपीने सावकारी पद्धतीने पीडितेचा छळ केला असेल, तर त्याच्यावर सावकारी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि इतर लागू असणाऱ्या कायद्यांनुसारही तातडीने कारवाई करावी, असेही निर्देश दिले आहेत.

Web Title: the accused raped a woman for two years In Beed, after she refused, he shared the nude video and photos on social media, due to which the victim attempted suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.