रानडुकरांमुळे बैल बिथरून बैलगाडीसह तलावात शिरले; आजोबा अन् नातू बुडून गतप्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 05:02 PM2022-12-22T17:02:20+5:302022-12-22T17:02:49+5:30

शेतात निघालेल्या आजोबांसह नातवाचा तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

The bulls entered the lake, scattered by wild boars; death of drowned Grandfather and grandson with bullock cart | रानडुकरांमुळे बैल बिथरून बैलगाडीसह तलावात शिरले; आजोबा अन् नातू बुडून गतप्राण

रानडुकरांमुळे बैल बिथरून बैलगाडीसह तलावात शिरले; आजोबा अन् नातू बुडून गतप्राण

Next

दिंद्रुड (बीड): रानडुकराच्या हल्ल्याने बिथरलेली बैल बैलगाडीसह तलावात शिरली. यावेळी बैलगाडीत असलेल्या आजोबाचा आणि एका नातवाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एक नातू बैलावर बसून बाहेर आल्याने बचावला. या घटनेत एक बैल देखील दगावला आहे. मृत शेतकरी असून धारूर तालुक्यातील कासारी येथील रहिवासी होते. 

कबीर बाशुमिया सय्यद (वय 70 वर्ष) हे आपला नातू आजमत अखिल सय्यद (वय दहा वर्ष)व आतिक अखिल सय्यद (वय १२वर्ष) या दोन नातवांसमवेत कासारी शिवारातील बालाघाट डोंगरात असलेल्या वाघदरा तलावाच्या मार्गाने शेताकडे आज गुरुवारी दुपारी बारा वाजे दरम्यान निघाले होते. याच दरम्यान तलावाच्या काठावर असलेल्या रानडुकरांनी बैलांवर हल्ला केल्याने बैल बिथरले आणि तलावाच्या पाण्यात शिरले. पाण्यातून बैल वेगाने जात असताना बैलगाडीसह त्यातील आजोबा आणि नातू बुडाले. 50 फूट बैलगाडीला बैलांनी ओढत नेत होते. यात कबीर सय्यद व आजमत सय्यद या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आतिक अखिल सय्यद हा एका बैलावर बसून तलावा बाहेर आला त्यामुळे तो वाचला. 

ही थरारक घटना तलावाजवळ जनावरे चालत असलेल्या मोतीराम सदाशिव उघडे या शेतकऱ्याने पाहिली. त्यांनी आरडाओरडा केल्याने तलावाकडे आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. तलावात उडी घेत शेतकऱ्यांनी दोन्ही बैलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत कबीर सय्यद व आजमत सय्यद या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मयतांचा पंचनामा करत शव भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कासारीसह धारूर तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

 

 

Web Title: The bulls entered the lake, scattered by wild boars; death of drowned Grandfather and grandson with bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.