एसयूव्ही-रिक्षा अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी चार जणांच्या मृत्यूने आकडा आठ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 01:33 PM2022-06-03T13:33:08+5:302022-06-03T13:33:51+5:30

केज-अंबाजोगाई रोडवर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघातात जागीच चार जणांचा मृत्यू झाला होता

The death toll in SUV-rickshaw accidents has risen; The death toll rise to eight with four more killed | एसयूव्ही-रिक्षा अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी चार जणांच्या मृत्यूने आकडा आठ वर

एसयूव्ही-रिक्षा अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी चार जणांच्या मृत्यूने आकडा आठ वर

Next

केज (बीड) :- केज -अंबाजोगाई महिमार्ग क्र ५४८(डी) या रस्त्यावर चंदन सावरगाव ते होळ दरम्यान झालेल्या रिक्षा व एसयुव्ही कारच्या भीषण अपघातातील मयतांचा आकडा वाढला असून आणखी चौघांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या अपघातात मृतांची संख्या आठ झाली आहे.

केज अंबाजोगाई महामसर्ग क्र ५४८-डी या महामार्गावर चंदन सावरगाव ते होळ दरम्यान दि २ जून रोजी सायंकाळी ५:३० वा च्या दरम्यान झालेल्या रिक्षा क्र. (एम एच-२३/एक्स-५२२९) आणि इनोव्हा कार क्र (एम एच-१६/सी एन-७००)च्या भीषण अपघातात मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके (४८ वर्ष), प्रिया दीपकसिंग गोके (२ वर्ष), वीरसिंग दीपकसिंग गोके (१ वर्ष)  आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (३५ वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

तर इतर आठ जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचार सुरू असताना जखमी पैकी हरजितसिंग बादलसिंग टाक, दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, चंदाबाई बादलसिंग टाक, भारती कौर दिपकसिंग गोके या चौघांचा आज मृत्यू झाल्याची माहीती युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांनी दिली आहे.

 

Web Title: The death toll in SUV-rickshaw accidents has risen; The death toll rise to eight with four more killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.