Video: ऐन बैठकीत कोब्रा सापाच्या 'एन्ट्री'ने आरोग्य कर्मचाऱ्यांची उडाली धांदल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 03:05 PM2022-11-01T15:05:03+5:302022-11-01T15:05:03+5:30
बैठक सुरू असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक निघाला कोब्रा साप
- नितीन कांबळे
कडा (बीड): धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी कर्मचाऱ्यांची मासिक बैठक सुरू असतानाच अचानक भलमोठा कोब्रा साप निघाल्याने एकच खळबळ उडाली. पाऊण तास ठाण मांडलेल्या सापाला अखेर सर्पमित्र अर्जुन चौधरी यांनी पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकिचे आयोजन सोमवारी दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक सुरू असलेल्या हाॅलमध्ये भलामोठा साप निघाला. सापाला पाहताच कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. त्यानंतर तब्बल पाऊण तास हा कोब्रा साप तेथेच होता.
बीड: बैठक सुरू असताना धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक निघाला कोब्रा साप, आष्टी तालुक्यातील घटना#beedpic.twitter.com/Fr7D3goizs
— Lokmat (@lokmat) November 1, 2022
दरम्यान, धामणगाव येथील सर्पमित्र अर्जुन चौधरी याना याची माहिती देण्यात आली. चौधरी यांनी तत्काळ आरोग्य केंद्रात येत सापास पकडून सुरक्षितरित्या निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिला. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.