अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:25 PM2024-03-29T14:25:05+5:302024-03-29T14:25:16+5:30

दीड महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता

The fugitive police constable who molested a minor girl was finally arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत 

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत 

- नितीन कांबळे
कडा:
नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबईवरून गावी येऊन नातेसंबंधातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना  फेब्रुवारी महिन्यातील 'प्राॅमिस 'डे' च्या दिवशी घडली होती. याप्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले.

आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातील एका नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबई येथे क्कार्टरला असताना ११ फेब्रुवारी रोजी गावी येऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.याकामी त्याच्याच गावातील दोन मित्रांनी त्याला मदत केली होती. आष्टी पोलिस ठाण्यात १५ फेब्रुवारी रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते. 

दरम्यान, १५ दिवसांपूर्वी पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फड गाठला. टॅक्टरवर चालक म्हणून काम करत असलेला समीर खेडकर व जवळच गॅरेजवर काम करत असलेला हरिओम खेडकर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोघाजणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर आष्टी तालुक्यातील एका गावात मुख्य आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्याच्या गुरूवारी रात्रीमुसक्या आवळल्या. ही कारवाई पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे,मुद्दशर शेख,नितीन साप्ते यांनी केली. फरार कालावधीत मुख्य आरोपी पोलिस शिपायाना बीड न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण न्यायायलयाने तो जामीन अर्ज फेटाळला होता.

Web Title: The fugitive police constable who molested a minor girl was finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.