परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वात उंच पाचवी चिमणीही जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 04:40 PM2024-03-01T16:40:18+5:302024-03-01T16:41:18+5:30
परळीचे वैभव असलेल्या जुन्या थर्मलचे सर्व पाच संच आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आले आहेत.
- संजय खाकरे
परळी: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या येथील जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्र (थर्मल) मधील 210 मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक ५ ची सर्वाधिक उंच असलेली २१० मीटर उंचीची चिमणी आज शुक्रवारी सुरक्षितपणे दुपारी २.१५ वाजता पाडण्यात आली. काल गुरुवारी संच क्रमांक चारची चिमणी जमीन दोस्त करण्यात आली होती.
परळीचे वैभव असलेल्या जुन्या थर्मलचे सर्व पाच संच आयुर्मान संपल्याने भंगारात काढण्यात आले आहेत. संच क्रमांक चारपाठोपाठ संच क्रमांक पाचची ही चिमणी आज जमीनदोस्त झाली आहे. 1987 मध्ये संच क्रमांक पाच हा कार्यान्वित झाला होता. या संचातील वीज निर्मिती व इंधन बचती बद्दलचे पुरस्कार एकेकाळी परळी थर्मल ला प्राप्त झाले होते. आशिया खंडात परळी औष्णिक विद्युत केंद्राचा नाव लौकिक होता. गुरुवारी संच क्रमांक चारची चिमणी पाडली त्या पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशी संच क्रमांक पाचची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. परळीची ओळख असलेली थर्मलची चिमणी पाडण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
210 मेगावॉट क्षमतेच्या संच क्रमांक तीन हा 2022 मध्ये स्क्रॅप मध्ये करण्यात आला त्यानंतर 2024 मध्ये 210 मेगावॉट क्षमतेचे संच क्रमांक ४ व ५ हे दोन संच स्क्रॅप मध्ये निघालेआहे तर 30 मेगावॉट क्षमतेचे दोन संच अनेक वर्षांपूर्वी भंगारात काढण्यात आले आहे.. 15 नोव्हेंबर 1971 मध्ये 30 मेगावॉट क्षमतेचा पहिला संच कार्यान्वित झाला होता त्यानंतर 30 मेगावॉट क्षमतेचा संच क्रमांक 2 हा 1972 मध्ये कार्यान्वित झाला होता.
परळीचे वैभव जुन्या थर्मलच्या सर्व खुणा पुसल्या गेल्या, सर्वाधिक उंचीची पाचवी चिमणीही जमीनदोस्त pic.twitter.com/s1lH78FAu0
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 1, 2024
आयुर्मान संपल्यामुळे पाडल्या चिमण्या
जुन्या थर्मल मधील एकूण पाच संचाची स्थापित क्षमता 690 मेगावॅट एवढी होती. हे सर्व संच कालबाह्य व आयुर्मान संपल्यामुळे स्क्रॅप मध्ये काढण्याचा निर्णय महाजनकोने घेतला आहे. परळी तालुक्यातील दाऊतपुर ,दादाहरी वडगाव शिवारातील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅटचे प्रत्येकी नवीन तीन संच चालू आहेत या तीन संचातून वीज निर्मिती होत आहे. यातील संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे.
सौरऊर्जा प्रकल्प प्रस्ताव
जुन्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे डॉ अनिल काठोये मुख्याभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी