लेकीला भेटायला आई १०० किमीवरून आली, १०० मीटरवर तिचं घर असताना अपघाती सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 12:56 PM2023-08-03T12:56:12+5:302023-08-03T12:56:26+5:30

माय लेकीची भेट अधुरी! लेकीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलेचा अपघाती मृत्यू

The mother came from 100 km to meet her daughter, died in accident when the house was 100 meters away | लेकीला भेटायला आई १०० किमीवरून आली, १०० मीटरवर तिचं घर असताना अपघाती सोडून गेली

लेकीला भेटायला आई १०० किमीवरून आली, १०० मीटरवर तिचं घर असताना अपघाती सोडून गेली

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा -
मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आईचा रस्ता ओलांडताना कारचा धक्का लागल्याने पाठीमागून येणार्‍या बसखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली. तायराबी शेख ( ७० रा.कुक्कडगांव, उस्मानाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यातील कुक्कडगांव येथील तायराबी शेख या आष्टी तालुक्यातील धानोरा येथे राहत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी बुधवारी आल्या होत्या. धानोरा येथे बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान उतरल्यानंतर त्या मुलीच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. यावेळी अहमदनगरवरून जामखेडकडे जाणार्‍या कारने ( क्रमांक एम.एच १३ एजे१९००) धक्का दिल्याने त्या रस्यावर पडल्या याचवेळी भोकरवरून अहमदनगरकडे जात असलेल्या बसखाली ( क्रमांक एम.एच.२० बीएल ४०१०) चिरडल्या गेल्या. यातच तायराबी शेख यांचा मृत्यू झाला. 

माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार बाबू तांदळे, भरत माने यांनी भेट देऊन पंचनामा केला. कडा प्राथमिक आरोग्य शवविच्छेदन करण्यात आले. अंभोरा पोलिस ठाण्यात अपघाताला कारणीभूत ठरणारी दोनही वाहने लावण्यात आली आहेत.

माय लेकीची भेट राहिली अधुरी....
१०० किलो मीटर अंतरावरून मुलीला भेटण्यासाठी आलेल्या आईला मुलीच्या घरी जाण्यासाठी १०० मीटर अंतर पार करायचे होते. पण एवढ्या अंतरावर येऊन देखील मायलेकीची भेट अधुरी राहिली. 

Web Title: The mother came from 100 km to meet her daughter, died in accident when the house was 100 meters away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.