दुःखाचा डोंगर बाजूला सारून बजावला हक्क; आजीच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण कुटुंब मतदान केंद्रावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 20:55 IST2024-11-20T20:54:50+5:302024-11-20T20:55:23+5:30

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

The mountain of sorrow was moved aside, the right exercised; Whole family at polling booth after grandmother's funeral | दुःखाचा डोंगर बाजूला सारून बजावला हक्क; आजीच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण कुटुंब मतदान केंद्रावर

दुःखाचा डोंगर बाजूला सारून बजावला हक्क; आजीच्या अंत्यविधीनंतर संपूर्ण कुटुंब मतदान केंद्रावर

परळी वैजनाथ (बीड) : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू आहे. खऱ्या अर्थाने हा लोकशाहीचा उत्सव आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजावणे अत्यंत आवश्यक असून हे आपले कर्तव्य असल्याची भावना नागरिकांमध्ये असल्याची उदाहरणे दिसून येतात. असेच उदाहरण परळी येथे घडले असून घरातील आजीचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही परळीतील प्रयाग कुटुंबियांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

परळी वैजनाथ येथील मोंढा भागातील व्यापारी हरीश व गिरीश प्रयाग यांच्या आजी कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग यांचे मतदान दिनाच्या आदल्या दिवशी ( दि.१९) वृद्धापकाळाने निधन झाले. कावेरीबाई रंगनाथराव प्रयाग या अतिशय कुटुंबवत्सल, धार्मिक, मनमिळावू व प्रयाग कुटुंबाच्या आधारवड म्हणून परिचित होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडं,पतवंडं असा परिवार आहे. सुधीर रंगनाथराव प्रयाग यांच्या त्या आई होत. त्यांच्या पार्थिवावर आज ( दि. २०) परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान, आज मतदान प्रक्रिया सुरू असताना प्रयाग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, आजीच्या निधनाचे दुःख असतानाही संपूर्ण प्रयाग कुटुंबाने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. सकाळी आजीवर अंत्यसंस्कार करून दुःखद अंतकरणाने का होईना परंतु आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जात संपूर्ण प्रयाग कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: The mountain of sorrow was moved aside, the right exercised; Whole family at polling booth after grandmother's funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.