मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 10:55 AM2022-02-08T10:55:50+5:302022-02-08T10:56:06+5:30

अतिक्रमण धारकाने सोमवारी वृध्द महीलेची अंत्ययात्रा रोखल्याने नातेवाईकांनी आज मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला आहे.

The question of encroachment on backward class cemeteries is on the table; relative sit with death body in front of Dharur tehsil office | मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

googlenewsNext

किल्लेधारूर ( बीड ) : तालूक्यातील गावदंरा येथे मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभुमीवरील आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अतिक्रमण धारकाने सोमवारी वृध्द महीलेची अंत्ययात्रा रोखल्याने नातेवाईकांनी आज मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला आहे. संबंधीत अतिक्रमण धारकाने विरोध केल्यने या नातेवाईकानी संबंधीत महीलेचे प्रेतच तहसीलकर्यालया समोर आणूण ठेवले.स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

तालूक्यातील गावदंरा येथे मागासवर्गीय समाजाची  वहीवाटी प्रमाणे गावाचे उत्तरेला स्मशानभुमी आहे. या स्मशानभुमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेजारील शेतकऱ्यांने अतिक्रमण केले आहे. यामुळे अंत्यसंस्कार करताना अतिक्रमणधारकाने अनेकदा अडथळा आणला होता. सोमवारी मागासवर्गीय समाजातील वृध्द महीला सरूबाई मारूती सौंदरमल ( 90) यांचे निधन झाले. अंत्यविधी साठी मृतदेह घेऊन जात असताना दहा वर्षा पासून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांने अंत्ययात्रा अडवली. यामुळे नातेवाईकानी अंत्यसंस्कार न करता मंगळवारी सकाळी मृतदेह थेट तहसील कार्यालया समोर आणूण ठेवला. स्मशानभुमी वरचे व रस्त्यावरील अतिक्रमण काढल्या शिवाय अःत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार व्हि एस शिडोळकर यांनी या नातेवाईकाना समजवण्याचा व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. माञ प्रश्न मार्गी लावल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्यावर नातेवाईक ठाम होते. तहसीलदार गावदंराकडे गेल्या आहेत. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवल्याने येथे पोलीस बंदोबंस्त कडक ठेवण्यात आला.

Web Title: The question of encroachment on backward class cemeteries is on the table; relative sit with death body in front of Dharur tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.