बाईक आडवी लावून रस्ता अडवला; तिघांनी कोयत्याच्या धाकावर ट्रक चालकाचे अडीज लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 07:38 PM2022-03-15T19:38:49+5:302022-03-15T19:38:49+5:30

काही कळण्याच्या आत तिघांनी रॉड, चाकू, कोयत्याचा धाक दाखवत चालकास मारहाण केली.

The three robbed the truck driver of Rs 2.5 lacks by blocking road | बाईक आडवी लावून रस्ता अडवला; तिघांनी कोयत्याच्या धाकावर ट्रक चालकाचे अडीज लाख लुटले

बाईक आडवी लावून रस्ता अडवला; तिघांनी कोयत्याच्या धाकावर ट्रक चालकाचे अडीज लाख लुटले

Next

माजलगाव (बीड):  रस्त्यात स्पोर्ट बाईक आडवी लावून ट्रक चालकाला कोयता अन चाकुचा धाक दाखवत मारहाण करून 2 लाख 50 हजार रूपये आणि मोबाईल असा पावणे तीन लाखाचा मुद्देमाल लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे  केसापूरी येथे घडली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

आज पहाटे चालक शेख अख्तर शेख पाशा (वय 32, चालक,  बीड) हे माजलगाव ते परतुर या मार्गावर ट्रक (एम.एच.43 वाय 2584) घेवून जात होते. दरम्यान, केसापुरी गावाजवळ एका विना क्रमांकाच्या स्पोर्ट बाईक रस्त्यात आडवी लावून तिघांनी ट्रक थांबली. काही कळण्याच्या आत तिघांनी रॉड, चाकू, कोयत्याचा धाक दाखवत चालक शेख अख्तर आणि त्यांच्या साथीदाराला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर नगदी 2 लाख 50 हजार व दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 60 हजाराचा मुद्देमाल लुटून तिघांनी स्पोर्ट बाईकवरून पोबारा केला. 

जखमी चालक शेख अख्तर यांनी घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जखमींवर उपचार सुरू असून याप्रकरणी शेख अख्तर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांजणा विरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात  दरोडयाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक विजयसिंह जोनवाल हे करत आहेत.

Web Title: The three robbed the truck driver of Rs 2.5 lacks by blocking road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.