पेट्रोल पंपावरून ३ हजार लिटर डिझेलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:34+5:302021-03-16T04:33:34+5:30
गेवराई : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरिल रानमळा फाटा येथील नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू होते. पंपाच्या ...
गेवराई : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरिल रानमळा फाटा येथील नवीन पेट्रोल पंपाचे काम चालू होते. पंपाच्या टाकीत लोड देण्यासाठी वापरण्यात आलेले डिझेल दोन मिनी हातपंपाच्या सहाय्याने उपसा करत तीन हजार लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. चोरीचा सुगाव पंपावर झोपलेल्या पंप मालकाला लागल्यानंतर चोरट्याने हातपंप व कँडी सोडून पळ काढला.
तालुक्यातील कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रानमळा फाट्याजवळ एका पेट्रोल पंपाचे काम चालू होते. याठिकाणी पेट्रोल आणि डिझेल टाकी बसविण्याचे काम पूर्ण झाले होते. फिटिंग पूर्ण झालेली होती. लोड देण्यासाठी टाकीमध्ये पाच हजार लिटर डिझेलचा साठा करून ठेवला होता. सोमवारी रात्री एक वाजता चोरट्यांनी पंपाच्या कंपाउंडची जाळी वर करून पंपामध्ये प्रवेश केला. डिझेल टाकीमध्ये पाईप टाकून मिनी पंपाच्या साहाय्याने कॅन भरत तीन हजार लिटर डिझेल चोरले. पंपावर झोपलेल्या मालकाला व गड्याला चोरट्यांचा सुगावा लागताच त्यांनी गावातील लोकांना फोन करून माहिती दिली. घटनास्थळी लोक जमा होत असल्याचे पाहताच चोरट्यांनी मिनी हातपंप व ५२ कॅन तेथेच सोडून पळ काढला. यावेळी चोरट्यांकडे दोन जार असल्याचे दिसून आले. दोन लाख चाळीस हजार किंमतीचे डिझेल चोरीप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सपोनि साबळे, ए.एस.आय. फड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
===Photopath===
150321\sakharam shinde_img-20210315-wa0022_14.jpg~150321\sakharam shinde_img-20210315-wa0021_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील रानमळा येथे नवीन पेट्रोल पंपावर हातपंप व कॅनच्या सहाय्याने डिझेल चोरी करण्यात आली. सुगावा लागताच चोरटे साहित्य तेथे टाकून पसार झाले.