चोरीचा बनाव आला मुकादमाच्या अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:46 PM2017-08-11T18:46:16+5:302017-08-11T18:46:20+5:30

साखर कारखान्याकडून घेतलेली उचल चोरट्यांनी रस्त्यात अडवून लुटल्याची तक्रार एका मुकादमाने बुधवारी पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा बनाव असून मुकादमाचा पैसे हडपण्याचा हेतू असल्याचे उघड झाल्याने त्यास अंमळनेर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. 

Theft and theft | चोरीचा बनाव आला मुकादमाच्या अंगलट

चोरीचा बनाव आला मुकादमाच्या अंगलट

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत 

पाटोदा (बीड ), दि. ११  : साखर कारखान्याकडून घेतलेली उचल चोरट्यांनी रस्त्यात अडवून लुटल्याची तक्रार एका मुकादमाने बुधवारी पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा बनाव असून मुकादमाचा पैसे हडपण्याचा हेतू असल्याचे उघड झाल्याने त्यास अंमळनेर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. 

म्हातारदेव अश्रुबा खेडकर (65) रा चिंचपूर इजदे जि नगर असे बनाव करणाऱ्या मुकादमाचे नाव आहे. खेडकर याने बुधवारी (दि. ९ ) अंमळनेर पोलिसात मंगळवारी त्याच्या कडील २ लाख रुपये अज्ञातांनी लुटल्याची तक्रार दिली होती.  दिवसा मारहाण करून २ लाखाची रक्कम  लुटल्याचे प्रकरण गंभीर असल्याने विभागीय पोलिस आयुक्तांनी  प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याबाबत सूचना दिल्या. 

यानुसार, उपनिरीक्षक ए.बी. गटकुळ यांनी खेडकर याची मंगळवारची  (दि. ८ ) सर्व माहिती मिळवली. तो घटनेदिवशी राहूरी , नगर भागात असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे खेडकर याची पोलिसांनी विचारपूस करत पोलिसी  खाक्या दाखवताच त्याने खोटी तक्रार दिल्याची कबुली दिली. पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याकडून घेतलेल्या उचलीचा तगादा चुकवण्यासाठी त्याने हि खोटी तक्रार केल्याचे सांगितले. जमादार बाप्पासाहेब अर्सुळ यांच्या तक्रारीवरुन खेडकर विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 

Web Title: Theft and theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.