आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:09 PM2020-11-21T15:09:31+5:302020-11-21T15:12:52+5:30

मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. 

Theft in MLA's husband credit union; Thieves stole Rs 2 lakh along with Rs 57,000 worth of chillers | आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

आमदार पतींच्या पतसंस्थेत चोरी; चोरट्यांनी ५७ हजाराच्या चिल्लरसह २ लाख पळवले

Next
ठळक मुद्दे. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून चोर आले तीन चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट

अंबाजोगाई : भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांची शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरील सायगाव नाका परिसरात असलेली अंबाजोगाई नागरी सहकारी पतसंस्था फोडून चोरट्यांनी ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली. मागील काही दिवसात अंबाजोगाई शहरात चोऱ्यांचे सत्र सुरु असून थेट आमदारांची पतसंस्था फोडून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. 
 
अक्षय मुंदडा हे अंबाजोगाई नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. शहरातील सायगाव नाका परिसरात स्व.मीनाताई ठाकरे चौकात या पतसंस्थेचे कार्यालय आहे. शुक्रवारी दैनंदिन कामकाज आटोपल्यानंतर जमा झालेली २ लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम कुलुपबंद कपाटात ठेऊन सर्व कर्मचारी कार्यालय बंद करून निघून गेले. शनिवारी पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या चोरट्यांनी पतसंस्थेचे शटर उचकून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ५७ हजारांच्या चिल्लरसह दोन लाख २ हजार ६६७ रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. शनिवारी सकाळी ६.३० वाजता ही चोरी उघडकीस आली असे पतसंस्थेचे व्यवस्थापक रामलिंग गुरुलिंगअप्पा सोनटक्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. 

अक्षय मुंदडा यांनी खबर दिल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय कांबळे करत आहेत. मागील काही कालावधीत अंबाजोगाई शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने आहे. चोरट्यांनी थेट आमदारांची पतसंस्था फोडली तिथे आपल्या घरांच्या सुरक्षिततेचे आय होणार या चिंतेने सर्वसामान्य नागरिकात दहशत पसरली आहे. 
 
चोरटे सीसीटीव्हीत कैद :
दरम्यान, पतसंस्थेसमोरील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटे कैद झाले आहेत. पहाटे २.३० ते ३.१५ च्या दरम्यान कारमधून आलेल्या तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. सदर फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. तसेच, पोलिसांना चोरट्यांच्या हाताचे ठसे मिळाले असून ठशांची शहानिशा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Theft in MLA's husband credit union; Thieves stole Rs 2 lakh along with Rs 57,000 worth of chillers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.