बीडमध्ये मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:25 AM2018-03-08T00:25:58+5:302018-03-08T00:26:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : नाशिक, अहमदनगर, बीड जिल्ह्यातून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलून नंतर त्यांची ...

Theft in mobile number change in Beed and change the number of IMEI numbers | बीडमध्ये मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलणारे गजाआड

बीडमध्ये मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलणारे गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्दे२७ मोबाईल हॅन्डसेटसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाशिक, अहमदनगर, बीड जिल्ह्यातून विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल चोरून आयएमइआय क्रमांक बदलून नंतर त्यांची विक्री करणाºया टोळीचा बीड पोलिसांनी पदार्फाश केला. मंगळवारी रात्री बीड शहरातील रहमत नगर भागातील एका घरावर छापा मारून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २७ मोबाईल हॅन्डसेटसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

बीड शहरातील रहमत नगर भागात राहणारा गहिनीनाथ मनोहर पाळवदे हा त्याच्या घरामध्ये संगणकाचा वापर करून चोरीच्या मोबाईलवरील आयएमइआय क्रमांक बदलून त्यावर बनावट क्रमांक टाकत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. खातरजमा झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास पाळवदेच्या घरावर छापा टाकला असता चोरीच्या मोबाईलवरील आयएमइआय क्रमांक बदलत असताना तो आढळून आला. यावेळी गहिनीनाथकडे चोरीचे मोबाईल घेऊन आलेले आणि त्याला मदत करणारे सतिष सुखदेव गायकवाड (रा.हिरवरसिंगा ता.शिरूर), सुभाष अर्जुन गायकवाड (रा. शिरापुर धुमाळ ता. शिरूर), अंकुश विश्वनाथ काळे (रा.विठ्ठलनगर, वृंदावन गार्डनसमोर, एमआयडीसी रोड बीड) या तिघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी कलम ३७९, ३४, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ४३ (अ), ६६ (ब) अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलूबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, मोहन क्षीरसागर, शेख सलीम, मनोज वाघ, शेख नसीर, प्रसाद कदम, विष्णू चव्हाण, अशोक हंबर्डे, मुकुंद सुस्कर, सिरसाट यांनी केली.
सदरील चार आरोपींकडून पोलिसांनी, आयएमइआय क्रमांक बदललेले ६ व इतर २१ असे एकुण २७ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले. मोबाईलचा आयएमइआय क्रमांक बदलण्यासाठी वापरण्यात येणारे संगणक, आॅक्टोपॉस, मरॅकल बॉक्स, सिमकार्ड असलेले राऊटर वायफाय असे एकूण ३ लाख १ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Theft in mobile number change in Beed and change the number of IMEI numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.