मिरकाळा येथे बैलजोडीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:26+5:302021-04-16T04:33:26+5:30

गेवराई : गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ऐन मशागतीच्या ...

Theft of a pair of oxen at Mirkala | मिरकाळा येथे बैलजोडीची चोरी

मिरकाळा येथे बैलजोडीची चोरी

googlenewsNext

गेवराई :

गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील एका शेतकऱ्याची बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ऐन मशागतीच्या दरम्यानच बैलजोडी चोरीला गेल्याने संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी बुधवारी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील मिरकाळा येथील शेतकरी पोपट रंगनाथ मुंढे यांचा बैलाचा गोठा गावकुसाजवळ आहे. दरम्यान पोपट मुंढे हे सोमवारी सायंकाळी बैलांना चारावैरण करुन घरी गेले असता सोमवारी रात्रीच्या सुमारास या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांची बैलजोडी चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

दरम्यान दोन दिवस माजलगाव, पाथर्डीसह आसपास शोध घेण्यात आला मात्र बैलजोडी आढळून आली नाही. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू असून ऐन कामाच्या दरम्यान दोन्ही बैल चोरीला गेल्याने शेतकरी पोपट मुंढे हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सदरील बैलाची किंमत ९० हजारांच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास बिट अमलदार सतिश खरात करत आहेत. दरम्यान सध्याच्या परिस्थितीत गेवराई तालुक्यातील विविध ठिकाणी भुरट्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढत असून मोबाईल, बैलजोडी, शेतातील इंधन मोटारी सह आदि चोरीला जात असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Theft of a pair of oxen at Mirkala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.