नांदेवालीत चंदनाच्या झाडाची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:59 AM2019-06-06T00:59:34+5:302019-06-06T01:00:39+5:30
तालुक्यातील नांदेवाली परिसरातील शेतातून चंदनाच्या झाडांची कत्तल करत झाडे चोरी केले आहेत.
शिरुर कासार : तालुक्यातील नांदेवाली परिसरातील शेतातून चंदनाच्या झाडांची कत्तल करत झाडे चोरी केले आहेत. रात्रीच्या चंदनाच्या झाडावर चोरटे राजरोस डल्ला मारत असले तरी शेतकरी त्याची तक्र र पोलिस ठाण्यात करत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे.
तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थितीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर चारा छावणीवर शेतकऱ्यांना रात्रंदिवस थांबावे लागत आहे. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी नांदेवाली येथील शेतकरी श्रीरंग भोसले, पांडुरंग भोसले यांच्या राळेसांगवी रस्त्यावरील शेतातील चंदनाच्या झाडांची सोमवारी कत्तल केली. ते झाडे रस्त्यावर आडवे पडल्याने सकाळी रस्ता बंद झाला होता. परिसरातील इतर ठिकाणच्या चंदनाच्या झाडांची कत्तल करीत चोरट्यांनी झाडे चोरली. मात्र शेतकरी तक्रार देत नसल्याने हे प्रकार वाढले आहेत. यापूर्वी आर्वी येथे चंदनाच्या झाडाची चोरी करताना चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. पण ते पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे या परिसरात रात्री पोलीस गस्त घालण्याची मागणी होत आहे.