धारूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी दरम्यान महिलेवर चोरट्यांचा कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:00 AM2020-08-26T11:00:06+5:302020-08-26T15:12:07+5:30

पोलिसांच्या निष्क्रीयतेने शहरात चोऱ्यांचे सञ सुरूच

Theft session continues in Dharur; Thieves stab a woman during a burglary | धारूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी दरम्यान महिलेवर चोरट्यांचा कोयत्याने वार

धारूरमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी दरम्यान महिलेवर चोरट्यांचा कोयत्याने वार

Next
ठळक मुद्देपोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे

धारूर : शहरातील आझादनगर भागातील एका महिलेवर चोरट्यांनी पहाटे चारच्या सुमारास घरात घुसुन कोयत्याने हल्ला करत लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. महिलेस येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शहरात पोलीसाचे निष्क्रीयते मुळे चोऱ्याचे सञ सुरूच असून नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे 

काल शहरातील गिता ज्ञान आश्रमात चोरट्यांनी धुडगूस घातल्याची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी सदरील घटना घडली आहे. शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिसरातील आझाद नगर भागातील रहिवाशी या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. या भागातील हुसेनाबी नवाब शाह या महिलेवर पहाटे हा हल्ला झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात महिलेवर प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाईला हलवण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडत असलेल्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आवाहन ठरत आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळी जावून सखोल चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Theft session continues in Dharur; Thieves stab a woman during a burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.