ट्रॅक्टर हेडची चोरी ; चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:14+5:302021-01-03T04:34:14+5:30

नितीन भास्कर लंगडे (रा.खापरवाडी ता.वडवणी) हे शेतीव्यवसाय करतात. २२ डिसेंबर रोजी ते त्यांच्या ट्रॅक्टर हेडला (क्र. एम.एच.२८ ए झेड ...

Theft of tractor head; Crime on all four | ट्रॅक्टर हेडची चोरी ; चौघांवर गुन्हा

ट्रॅक्टर हेडची चोरी ; चौघांवर गुन्हा

googlenewsNext

नितीन भास्कर लंगडे (रा.खापरवाडी ता.वडवणी) हे शेतीव्यवसाय करतात. २२ डिसेंबर रोजी ते त्यांच्या ट्रॅक्टर हेडला (क्र. एम.एच.२८ ए झेड २४६५) ट्रॉली लावून बीड तालुक्यातील सुर्डी येथून ऊस भरून पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याकडे जात होते. परळीनजीकच्या सिरसाळा ठाणेहद्दीतील वांगी शिवारात लंगडे यांनी ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उभा करुन प्रातर्विधीसाठी ते बाजूच्या शिवारात गेले असता पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या चौघांनी ट्रॉलीची पिन काढून ट्रॅक्टरचे हेड चोरुन नेले. विजेच्या प्रकाशात नितीन लंगडे यांनी एका चोरट्यास ओळखले. याप्रकरणी लंगडे यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण कदम (रा.पिंपळटक्का ता.वडवणी) व अन्य तीन अनोळखींविरुद्ध सिरसाळा ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार नन्नवरे करीत आहेत.

चोरटी वाळू वाहतूकप्रकरणी गुन्हा

बीड : नदीपात्रातील उत्खनन केलेल्या वाळूची शासनाचा कर बुडवून चोरटी वाहतूक करणारा टिप्पर महसूल पथकाने ताब्यात घेतला. याप्रकरणी टिप्परचा (क्र.एम.एच.२५ यु. १४५०) चालक सचिन चव्हाण (माजलगाव) याच्याविरुद्ध केसापुरी सज्जाचे तलाठी लक्ष्मण मुळे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या टिप्परमध्ये ४ ब्रास वाळू आढळून आली. कारवाईत १० लाखांचा टिप्पर व वाळू जप्त करण्यात आली.

धावत्या ट्रॅक्टरवर बस उलटली

बीड : माजलगाव तालुक्यातील गंगामसला शिवारातून प्रवासी घेवून जाणारी एस.टी.बस क्रमांक (एमएच १४ बीटी २१५८) चालकाच्या हलगर्जीपणामुळे समोर चालणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर हेडवर जावून पलटली. ही घटना ३१ डिसेंबर रोजी घडली. यात ट्रॅक्टरमधील ऊस रस्त्यावर विखुरला गेला. या अपघातात बसची समोरील काच फुटल्याने मोठे नुकसान झाले. सहाय्यक फौजदार माणिक राठोड यांच्या फिर्यादीवरून बसचालक नंदकुमार गिरीविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft of tractor head; Crime on all four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.