..तर टोलनाका जाळून टाकू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:57 PM2019-03-09T23:57:18+5:302019-03-09T23:57:55+5:30
शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला.
बीड : शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला. बळजबरीने टोल उभारला तर उद्ध्वस्त कसा करायचा हे आम्हाला माहीत असल्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला.
औरंगाबाद - येडशी राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांना संपूर्ण मावेजा मिळावा, सर्व्हीस रोड द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. बायपास प्रश्नी व शेतकºयांच्या मावेजासाठी सरकार कानाडोळा करत असेल तर न्यायालयीन लढाईही आम्ही लढूत, असे प्रतिपादन माजी आ. सय्यद सलीम यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपासवर महालक्ष्मी चौकात राष्ट्रवादीच्या वतीने ९ मार्च रोजी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गेवराई शहरात केले होते. पाडळसिंगी येथील टोलनाका सुरु करण्यात येणार होता. गेवराईत हा कार्यक्रम सुरु असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या वतीने जबरदस्त रास्ता रोको आंदोलन झाले.
सदर रस्त्याचे काम अपूर्ण असताना इथल्या सत्ताधाºयांकडून आणि नेते मंडळींकडून उद्घाटनाचा घाट घातल्या गेला. याचा त्रास बीड जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. टोलनाका सुरु केल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागेल, असा जबरदस्तीने सुरु करण्यात आलेला टोलनाका कसा उद्ध्वस्त करायचा हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला.
स्थानिक आमदार, विकास पुरुष गडकरींकडे जातात कशाला?
जेव्हा बीड बायपास आणि महामार्गाचा सर्व्हे सुरु झाला तेंव्हापासून बीडचे स्वत:ला विकास पुरु ष म्हणून मिरवणारे स्थानिक आमदार, रेल्वे विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्याचे फोटो बाहेर आले. नितीन गडकरी यांना हे विकास पुरु ष नेमके कशासाठी भेटतात? हे जनतेने विचारल्यानंतर ते लोकांना बीड बायपास महामार्ग अशी कारणे सांगतात. परंतु, जनतेला ते नेमकं कशासाठी भेटतात, बायपाससाठी की अन्य कशासाठी? अशी कोपरखळी मारत टोल वसूल करणाºयांच्या व्यासपीठावर जाणाºया स्थानिक आमदारांनाच जनता धडा शिकवेल, असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला आहे.