वाळूघाटांवर कोरोना नियमांचे होतेय उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:36 AM2021-04-28T04:36:47+5:302021-04-28T04:36:47+5:30

बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच, शासनाकडून लिलाव झालेल्या वाळूघाटांवर मात्र पर्यावरणासह कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन ...

There are violations of corona rules on sand dunes | वाळूघाटांवर कोरोना नियमांचे होतेय उल्लंघन

वाळूघाटांवर कोरोना नियमांचे होतेय उल्लंघन

Next

बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच, शासनाकडून लिलाव झालेल्या वाळूघाटांवर मात्र पर्यावरणासह कोरोना नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत आहे. एकाच ठिकाणी शेकडो वाहने, हजारो लोक असतात. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत सर्वच वाळूघाट बंद ठेवावेत, तसेच येत्या ८ दिवसांत सदरील वाळूघाटांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, माजलगाव तालुक्यातील आडोळ, गव्हाणथडी येथील शासकीय वाळूघाटांवर शासनाच्या पर्यावरण कायद्यांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. या ठिकाणी परवानगी नसताना जेसीबी, पोकलेनसह अन्य यंत्रांच्या साहाय्याने वाळूचे मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षाही किती तरी पटीने वाळुचा बेसुमार उपसा सुरू आहे. एका पावती वर ३ ब्रासची मान्यता असताना बेकायदेशीररीत्या एक पावतीवर ५ ब्रास वाळूचा उपसा केला जातो, तसेच आतापर्यंत किती उत्खनन झाले, याची प्रत्यक्ष मोजणी करण्यात यावी. वाळूघाटांवर होत असलेल्या अवैध उत्खननामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे, तसेच पर्यावरण कायद्याचेही उल्लंघन होत असल्याने सर्वच वाळुघाटांवर नियमानुसार कारवाई करून तत्काळ बंद करावेत. येत्या ८ दिवसांत ही कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिला आहे.

Web Title: There are violations of corona rules on sand dunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.