आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘दिलासा’ नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:25 AM2019-12-24T00:25:18+5:302019-12-24T00:25:40+5:30

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकी या कारणाला कंटाळून जिल्ह्यातील शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे.

There is no 'comfort' for the suicidal peasant family | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘दिलासा’ नाहीच

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ‘दिलासा’ नाहीच

Next
ठळक मुद्देआत्महत्या रोखण्यात प्रशासनासह समाजाचे अपयश : दुष्काळ अन् नापिकी आत्महत्येची प्रमुख कारणे

प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच नापिकी या कारणाला कंटाळून जिल्ह्यातील शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. आत्महत्येचा हा आकडा कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आजघडीला दिसत आहे. हे प्रशासनासोबतच समाजाचे अपयश आहे.
बीड जिल्हा हा कमी अवर्षणाचा जिल्हा आहे. दर एक वर्षाआड जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असते. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कायम हाल होतात. पिकांना भाव नसल्यामुळे घेतलेले कर्ज, कौटुंबिक गरजा भागविणे देखील जिकिरीचे होते. याच विवंचेनतून जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रत्येक वर्षात वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील सहा वर्षांमध्ये १२३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी प्रशासनाकडे आहे. यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आजच्या तारखेपर्यंत २१६ शेतक-यांनी नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हाच आकडा मागील डिसेंबरअखेर १८७ इतका होता. यामध्ये वाढ झाली आहे. ही वाढ चिंतेची बाब असून, शेतकरी वाचला तर देश वाचेल या भावनेतून ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन तसेच समाजातून सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी नेत्यांमधून व्यक्त केले जात आहे.
प्रशासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासाठी मागच्या वर्षी माजी आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या संकल्पनेतून उभारी हा प्रकल्प राबवण्यात आला होता. यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपये शासकीय मदतीसह कृषी, महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह इतर विभागातील योजनांचा लाभ देण्यात येत होते. यासाठी मर्यादित कालावधीची मोहीमही राबवण्यात आली. यावेळी बहुंताश कुटुंबाना त्यांच्या घरी जाऊन अधिकाºयांनी विविध योजनांचे लाभ दिले होते. परंतु भापकर हे सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर प्रशासनाकडून योजनेला ब्रेक लागला. जवळपास एक वर्षापासून या योजनेच्या माध्यमातून एकही लाभ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाना दिलेला नाही. पुन्हा अशा प्रकारचा उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाना योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
या योजनांचा दिला कमी लाभ
आत्महत्या शेतकरी कुटुंबियांना आरोग्य योजना, विहीर, शेततळे, शुभमंगल योजना, संजय गांधी निराधार योजना, कर्ज मंजुरी, घरकुल या योजनांचा कमी प्रमाणात लाभ दिल्याचे दिसून येते. जनधन बँक खाते, गॅस जोडणी, अन्नसुरक्षा योजना आदी योजनांचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात दिला आहे. शेतकरी कुटुंबियांकडून विविध योजनांची मागणी केली जाते. यावेळी सहानुभूतीपूर्वक अधिकारी व कर्मचा-यांनी याचा विचार करुन तात्काळ ती संबंधित पीडित कुटुंबाला देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष प्रमुख कुलदीप करपे यांनी व्यक्त केले.

Web Title: There is no 'comfort' for the suicidal peasant family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.