कोविड कालावधीत जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा व शासनात ताळमेळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:56+5:302021-05-06T04:35:56+5:30
आष्टी येथील गणेश विद्यालयात उभारलेल्या श्रीदत्त आयसोलेशन कोविड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी दरेकर बोलत होते. यावेळी आ.सुरेश धस,तहसीलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार ...
आष्टी येथील गणेश विद्यालयात उभारलेल्या श्रीदत्त आयसोलेशन कोविड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी दरेकर बोलत होते. यावेळी आ.सुरेश धस,तहसीलदार राजाभाऊ कदम,ना.तहसिलदार प्रदिप पांडूळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के,जयदत्त धस,भाजपा ता.सरचिटणीस शंकर देशमुख,पं.स.सभापती बद्रीनाथ जगताप,अनिल ढोबळे,डाॕ.नितीन घोडके,सुनील रेडेकर,विनय पडधरीया आदी उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, बीड जिल्हा प्रशासकीय यंत्रणा आणि शासन यांच्यात ताळमेळ नसल्यामुळे अनेक कोविड सेंटरमधील रुग्ण तोंडाला मास्क न बांधता जनतेत मिसळतात. काही ठिकाणी कोविड सेंटरवर जेवण मिळत नसल्यामुळे रुग्ण पळून जात असल्याचेही दिसून आले तर अंबाजोगाई येथे ऑक्सिजन कमी पडल्यामुळे रुग्ण दगावण्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावरून प्रशासन ढिसाळ असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाचा टेस्टिंग कमी करण्याचा निर्णय हा केवळ रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी आहे, असे दिसून आले आहे.परंतु असे करणे म्हणजे भविष्यात फार मोठा धोका पत्करण्यासारखे असल्याचे दरेकर म्हणाले. सूत्रसंचालन डॉ. दिपक भवर यांनी केले.
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केलेलं ‘राज्यातील कोरानाची लाट कमी होण्यास सुरुवात झाली आहे’ हे वक्तव्य चुकीचे असल्याचे आ. सुरेश धस यावेळी म्हणाले. राज्यभरात बहुतांश ठिकाणी कोरोना चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या किटची कमतरता असल्यामुळे मागील ८ दिवसांपासून चाचण्याच बंद आहेत.कोरोनाची दाहकता वाढत आहे. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडं कमी कमी पडत आहेत, अशा गंभीर परिस्थितीत हे वक्तव्य चुकीचे असल्याचे मत आ. धस यांनी व्यक्त केले.
===Photopath===
050521\img-20210505-wa0534_14.jpg