धारूरच्या किल्ल्यासाठी पहारेकरीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:40 AM2021-09-07T04:40:02+5:302021-09-07T04:40:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागाने केले आहे. मुख्यप्रवेशद्वार बसवले आहे या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्व विभागाने केले आहे. मुख्यप्रवेशद्वार बसवले आहे या किल्ल्यासाठी पहारेकरी नसल्याने पुरातन वैभवाच्या संरक्षणासह पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे स्वतंत्र पहारेकरी नियुक्त करून किल्ल्याचे पावित्र्य जपावे, आशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे नगर परिषदेच्या गटनेत्या उज्ज्वला सुधीर शिनगारे यांनी केली आहे.
धारूर येथील ऐतिहासिक किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करत राज्य शासनाचे पुरातत्व विभागाने सात कोटी रुपयांचा निधी देऊन या किल्ल्याची दुरुस्ती करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वार बसवून आतील प्रवेश बंद करण्यात आला. किल्ला दुरुस्तीनंतर इतिहास प्रेमी व पर्यटकांची ये-जा वाढली. या ठिकाणी पुरातत्व विभागाने खासगी संस्थेचे दोन पहारेकरी नियुक्त केले होते. मात्र कोरोना कालावधीत त्यांना कामावरून कमी करण्यात आले. कोणीच रखवालदार नसल्याने किल्ल्याचे कुलूप तोडणे, अवैद्य उद्योग करण्याचे प्रकार वाढले आहेत. पर्यटक व इतिहासप्रेमींना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच पर्यटक व इतिहास प्रेमींना सुरक्षेच्या दृष्टीने किल्ल्यात दोन पहारेकरी तत्काळ नियुक्त करावेत, अशी मागणी उज्ज्वला शिनगारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
060921\06bed_3_06092021_14.jpg
धारूर किल्ला पहारेकरी नेमा